केवळ शहरातीलच नव्हे तर संपूर्ण खेड्यापाड्यातील गरीबांची मुले शिकली पाहिजेत, या उदात्त हेतूने शिक्षणाची ज्ञानगंगा तळागळापर्यंत पोहचविण्याचे महत्तम कार्य करणारे, ने.भै. हि. शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा वारसा जपणारे कर्मयोगी स्व. मदनगोपालजी भैय्या यांची पुण्यतिथी नेवजाबाई भैय्या हितकारिणी शिक्षण संस्था परिवाराच्या वतीने स्व. मदनगोपालजी भैय्या पब्लिक स्कुल परिसरात आयोजित कार्यक्रमात साजरी करण्यात आली._
कार्यक्रमाची सुरुवात नेवजाबाई भैय्या हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोक भैय्या यांनी स्व. मदनगोपालजी भैय्या व हितकारिणी भैय्या यांच्या स्मृतीस्थळांवर पुष्पहार अर्पण व श्रद्धांजली वाहून करण्यात आली. प्रसंगी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व स्व. मदनगोपालजी भैय्या यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले. सोबतच एल. एम. बी. पब्लिक स्कुलच्या परिसरात भजन मंडळातर्फे भजने सादर करून श्रद्धांजली वाहिली. हभप देवानंद पिलारे, काशिनाथ मेश्राम, ठाकरे सर व एल. एम. बी. पब्लिक स्कुलचे शिक्षक स्वप्नील भोसले, निलेश दोनाडकर, पूजा हर्षे व विद्यार्थ्यांच्या चमुने सुमधुर आवाजात भजने सादर करीत स्व. मदनगोपालजी भैय्या यांना श्रद्धांजली अर्पण केली._
याप्रसंगी नेवजाबाई भैय्या हितकारिणी शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष स्नेहलताताई भैय्या, सहसचिव अॅड. भास्करराव उराडे, सदस्य तथा नगरसेवक राकेश कऱ्हाडे, विद्यमान नगरसेवक गौरव भैय्या, प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे, अजय भट्टड, प्रा. मेजर विनोद नरड, मुख्याध्यापिका एस. एस. लांजेवार, मुख्याध्यापक पी. एस. ठाकरे, प्राचार्य कादिर कुरेशी, मुख्याध्यापक जी. एन. रणदिवे, उपमुख्याध्यापक के. एम. नाईक, पर्यवेक्षक पी.व्ही. घोरूडे, प्रा. बेंदवार , राजेंद्र हेमके, प्रा. डॉ. धनराज खानोरकर, प्रा. डॉ. रविंद्र विखार प्रा. राजू आदे तथा नवजाबाई भैय्या हितकारिणी शिक्षण संस्थचे सर्व कर्मचारी व पदाधिकारी प्रामुख्यान उपस्थित होते._
कार्यक्रमाची सांगता वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सामुदायीक प्रार्थनेने करण्यात आली. प्रसंगी कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना काल्याचे वाटप करण्यात आले.