वाशिम : राज्याच्या हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाप्रमाणे यंदा मान्सूनचे आगमन नियोजीत वेळेपेक्षा लवकर होणार असून, दि. १ जून पर्यंत केरळ आणि दि. ७ ते दि. १०जून पर्यंत महाराष्ट्र विदर्भात मान्सूनच्या पावसाचे आगमन होणार असून यंदाच्या हंगामात मुबलक पण चांगल्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली असल्यामुळे शेतकरी राजा हर्षोल्लासात आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील वाशिम,मालेगाव, रिसोडसह उर्वरीत कारंजा उपविभागातही शेतकरी राजाने शेती मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे.जमिन नांगरणीची कामे जवळपास झाली असून, वखरणीच्या कामांनी जोर धरलेला आहे. शेतात ट्रॅक्टर द्वारे आणि ज्यांच्या कडे क्वचितच बैलजोडी आहे.असे शेतकरी आपल्या बैलजोडीच्या मदतीने शेतात वखरणी करतांना दिसत आहेत.तर ग्रामस्थ महिलांकडून काडी फणं वेचनी सुरु आहे. शिवाय बाजारपेठेत बियाणे आणि खतांच्या खरेदी करीताही शेतकरी पायपिट करीत असल्याचे दिसून येत आहे.