मौजा महालगाव (खु.) कक्ष क्र. 2 राखीव वनामध्ये दिनांक 13/02/2025 रोजी रात्रौ 09.30 वाजताचे दरम्यान वनकर्मचारी एस. के. शेंडे वपअ वरोरा, डि. बी. चांभारे क्षे.स. टेमुर्डा, जे. के. लोणकर क्षे.स. शेगाव, एस. व्ही. वेदांती वनरक्षक महालगाव, ब्रम्हणाथ वनरक्षक रामपुर, रोजनदारी वनमजूर व पि.आर.टी. टिम गस्त करीत असतांना आरोपी रुपेश धारसिंग दडमल, जयचंद सरबत मालवे, रामा संजय दडमल सर्व राहणार हिरापुर पो. कोसरसार ता. वरोरा, जिल्हा चंद्रपूर व संदिप बालीकचंद्र शेरकुरे रा. धोपटाळा, ता. कोरपना, जिल्हा चंद्रपूर हे कक्ष क्र. 2 राखीव वनामध्ये संक्षयास्पद अवस्थेत आढळून आले. त्यांची विचारणा केली असता ते वन्यप्राण्याची शिकार करण्याकरीता आल्याचे सांगितले. त्यांचेकडून शिकारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य वाघुर, लोखंडी भाला, नायलॉन दोरी, दुचाकी वाहन, मोबाईल जप्त करण्यात आलेले असुन त्यांचावर भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 9, 39, 2(16) व 51 अन्वये वनगुन्हा नोंद करुन आरोपींना त्याब्यात घेऊन कोर्ड विद्रद्यमान प्रथम श्रेणी न्यायलय वरोरा येथे दिनांक 14/02/2025 रोजी हजर करण्यात आले.
पुढील चौकशी व्हि. . तरसे सहाय्यक वनसंरक्षक (तेंदु), चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात सतिश के. शेंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी वरोरा डि. बी. चांभारे क्षे.स. टेमुर्डा, जे. के. लोणकर क्षे.स. शेगाव, एस. व्हि. वेदांती वनरक्षक महालगाव, करकाडे, केजकर, ब्रम्हनाथ वनरक्षक करीत आहे.