दि वाशिम अर्बन को ऑपरेटीव्ह बँक शाखा कारंजाचे स्थानांतरण मुलजीजेठा हायस्कुल समोरील प्रशस्त इमारतीत एचडीएफसी बँके लगत दि . ३० जून रोजी कारंजा येथे सकाळी १०.३० वाजता होऊन नियमीत व्यवहार खातेदाराचे सेवेत सुरु झाले. असे वृत्त आमचे सहप्रतिनिधी प्रा. अशोकराव उपाध्ये यांनी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांना कळवीले आहे.या संदर्भात त्यांनी सांगीतले की, या प्रसंगी कारंजा शहरातील दिग्गजासह खातेदारांची मोठया प्रमाणात उपस्थीती होती .
शाखा सभापती अशोक इन्नानी यांचे सुपूत्र आनंद इन्नानी यांनी सपत्नीक बालाजीचे पूजन करून होम हवनाने पूजा केली आणि बँकेची अधीक उन्नती होण्यासाठी प्रार्थना केली. यावेळी बँकेच्या अध्यक्षा श्रीमती शिला सुभाष राठी उपाध्यक्ष पुरुषोत्तम चरखा; डॉ राजकुमार हेडा ; बँकेचे संचालक प्रसीध्द हदयरोग तज्ञ डॉ अजय कांत; राजाभाऊ डोणगावकर; प्रा . शंकरराव पुंड ; प्रा सुधीर लुंगे यांची प्रमुख उपस्थीती होती . होमहवन पूजनानंतर उपस्थीत मान्यवरांनी तीर्थप्रसाद घेतला व शाखा व्यवस्थापक सतीष चौबे यांनी सर्वांना नवीन बँकेचे दर्शन घडविले . या प्रसंगी शाखा सभापती अशोक इन्नानी संचालक शंकरराव पुंड; मनीष साबू; सतीष शहा; नवल किशोर हेडा; नवल सारडा; रमाकांत भुतडा; राजेश बंग तर वाशिम येथून संचालक सुरेश लोथ; रमेशचंद्र बजाज; विष्णू सोनी; सुधीर राठी; राधेश्याम हेडा रमन अग्रवाल यांचे सह बँकेचे संचालक मंडळ यांची प्रामुख्याने उपस्थीती होती . उपस्थीत मान्यवरांसह खातेदार; बँकेचे हितचिंतक यांना अल्पोपहार देण्यात आला . कार्यक्रम यशस्वी करण्यास बँकेचे कर्मचारी वृंद यांनी अथक प्रयत्न केले . बँकेचे वतीने संचालक मनीष साबू; प्रा शंकरराव पुंड ; शाखाधीकारी सतीष चौबे यांनी सर्वांचे आभार मानले .