धनाचे कारंजा म्हणून ओळख असलेली कारंजा नगरी, स्वातंत्र्यानंतर मात्र विकासापासून कोसो दूर." महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी व्यक्त केली खंत.

कारंजा (लाड) : आजूबाजूच्या चारही जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या,कारंजा शहराला प्रचंड मोठा इतिहास असून,एकेकाळी ही नगरी सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जात होती.तसेच येथील धनाढ्य असलेल्या,संगई सावकाराने, दिल्लीहून आलेल्या अरब व्यापार्याकडून,सुवर्ण मुद्राच्या मोबदल्यात,उंटावरून लादलेली कस्तूरी,आपल्या बंगल्याच्या, बांधकामामध्ये वापरल्याची सत्यकहाणी आहे.येथील शेतकरी आपल्या जामिनीमध्ये,पांढरे सोने म्हणजे कापूस,भुईमुग, व सर्वप्रकारचीच कडधान्य पिकवित असल्यामुळे येथील,व्यापार मोठमोठ्या शहरांशी संलग्न होता. त्यामुळे येथे पूर्वी कपाशीचे मोठमोठे जीन,गठान गिरण्या व तेलघाण्या होत्या.व येथील नागरिकांना रोजगाराचे खूप मोठे साधन शहरातच उपलब्ध होते. त्यामुळे या भागातील कपाशीचा व्यापार करण्याकरीता, इंग्रज राजवटीने,शंकुतला रेल्वे मार्गाचे निर्माण केले होते.या नगरीतील कृषी उत्पन्न बाजार समिती ही केवळ भारतातीलच नव्हे,तर संपूर्ण आशिया खंडातील पहिली बाजारपेठ म्हणून ओळखली जाते.

कारंजा नगरी जैन धर्मियाचे तिर्थक्षेत्र म्हणूनही ओळखले जाते.येथील भगवान महाविरांच्या प्रतिमा दुर्मिळ म्हणून ओळखल्या जात असल्याने आणि येथील प्रेक्षणीय प्राचिन काष्टासंघ जैन मंदिर,श्री पद्मावती देवी मंदिर,दिगंबर जैन मंदिर बघायला देश विदेशातील जैन अनुयायांची वर्षभर मांदियाळी असते.शिवाय श्री दत्तावतार,श्री नृसिह सरस्वती स्वामी यांचे येथील संस्थानमुळे सुद्धा दररोज हजारो दत्त उपासक येथे संपूर्ण भारत वर्षातून येत असतात.मात्र आज रोजी, राज्यकर्त्या-शासनकर्त्याच्या उदासिनतेमुळे या नगरीचा विकास कोसो दूर राहीला आहे. असेच म्हणावे लागेल. . . हळूहळू येथील ऐतिहासिक वास्तू असलेले प्राचिन तलाव,चारही बाजूला असलेल्या वेशी (महाद्वार) लोप पावत आहेत.इतिहासाची साक्ष देणारी शिक्षणाची पंढरी, सांस्कृतिक नगरी,व्यापारी बाजार पेठ असलेल्या या नगरीत आज उच्च शिक्षणाची कोणतीच व्यवस्था नाही.आज रोजी हे ह्या शहराचे दुदैव आहे.कला,क्रिडा,संस्कृती, नाट्यकला,चित्रपट कला जपण्याकरीता एखादे खुले नाट्य सभागृह,सांस्कृतीक सभागृह,मोठे क्रिडांगण,क्रिकेट स्टेडियम नाही. येथे महाराष्ट्र औद्योगीक विकास संस्था नसल्याने,कोणतेच मोठे कारखाने,उद्योगधंदे उभे न राहू शकल्याने,येथील पंचक्रोशितील, सुशिक्षित बेरोजगार,कामगार, मजूरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरचे कारंजा शहर विकासा पासून कोसो दूर राहीलेले आहे.दुदैवाने आजतागायत कारंजा जन्मभूमिचे लोकप्रतिनिधी या शहराला मिळाले नाहीत.व जे काही बाहेरचे लोकप्रतिनिधी मिळाले त्यांनी येथील विकासावर कधी भर दिलाच नाही. . . . . कारंजा शहराचे रूपांतर सध्या तरी जिल्हा मुख्यालयात होणे तर शक्यच नाही.मात्र निदान महाराष्ट्र शासनाने कारंजा ह्या शहराला पुढील भविष्याकरीता आज रोजी,जिल्ह्याचा दर्जा जरी दिला. व तसा या शहराला विकास निधी देऊन,येथे शासकिय उच्च शिक्षण संस्था,वैद्यकीय महाविद्यालय,विधी महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय,सामाजिक न्याय संस्था उभारून येथील शिक्षणाचा प्रश्न सोडवावा.औद्योगीक वसाहत निर्माण करून,उद्योग धंदे आणून या शहरातील बेरोजगारीचा प्रश्न सोडवावा.येथील मुर्तिजापूर-यवतमाळ शंकुतला रेल्वेमार्गावरून रेल्वे सुरु करावी.तसेच धार्मिक,आध्यात्मिक व ऐतिहासिकतेच्या प्राचिन हिंदु व जैन धर्मियांच्या तिर्थक्षेत्राच्या या नगरीला,पर्यटन व तिर्थक्षेत्राचा दर्जा देऊन,तिर्थक्षेत्र व पर्यटन आराखड्यांतर्गत येथे विकासकामे करण्याची पूर्ण करण्याची मागणी,येथील कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी पाटणी यांनी मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांचेकडे करावी.व त्याकरिता येत्या पावसाळी अधिवेशनात लक्ष्यवेधी उपस्थित करावी.असी विनंती महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....