स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ब्रम्हपुरी सायकल क्लब ब्रह्मपुरी,नगरपरिषद ब्रम्हपुरी व पोलिस स्टेशन ब्रम्हपुरी तर्फे भव्य जनजागृती सायकल रॅली चे यशस्वी आयोजन १४/०८/२०२२ रविवारला सकाळी ६.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ब्रम्हपुरी येथे करण्यात आले होते.
या भव्य सायकल रॅली मध्ये ब्रम्हपुरी नगरपरिषद प्रशासनाचे मोठे सहकार्य लाभले यात शहरातील संपूर्ण नगरपरिषद लोकप्रतिनिधी,अधिकारी व कर्मचारी पावसाच्या सरी सुरु असतांना सहभागी झालेत तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाला प्रामुख्याने नगरपरिषदे च्या मुख्याधिकारी आसरीय जुही,ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन चे ठाणेदार रोशन यादव,नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष रिताताई उराडे,माजी नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष रेशमिताई पेशने प्रामुख्याने उपस्थित होत.
सायकल रॅली ची शेवट सामूहिक वंदे मातरम गीताने करण्यात आली.
या कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुयोग बाळबुधे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.विशाल लोखंडे,सुधाकरजी मेश्राम,डॉ.बिनजवे,श्री स्वप्नील अलगदवे,श्री.प्रवीण राऊत यांनी अथक परिश्रम घेतले.