कारंजा :सायकल चालवण्याचे मानवी जीवनाच्या आरोग्यासी खूप जवळचे नाते आहे. सायकल चालवल्याने मनुष्याचे आरोग्य चांगले राहून आयुष्यमान वाढते.मनुष्याचे आरोग्य चांगले राहावे म्हणून आज वर्ल्ड सायकल डे संपूर्ण जगात साजरा करण्यात येत आहे. वर्ल्ड सायकल डेनिमित्त रफ अँड टफ ग्रुप तर्फे दिनांक ०१ जून रोजी सकाळी ७:३० वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
रफ अँड टफ ग्रुप तर्फे कारंजा क्रीडा संकुल वर दररोज फिटनेस रनचे आयोजन करण्यात येत असते. सदर फिटनेस रन झाल्यानंतर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये झाशी राणी चौक येथून सायकल रॅलीला सुरुवात झाली.प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी किशोर बोंडे यांनी हिरवी झेंडी दाखवून सायकल रॅलीला सुरुवात केली. ही सायकल रॅली पुढं जाणता राजा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जयस्तंभ चौक, शिवाजी महाराज चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, मार्गे जाऊन परत झाशी राणी चौकात समारोप करण्यात आला. सायकल रॅलीमध्ये रफ अँड टफ ग्रुपचे सदस्य यासह बहुसंख्य सायकल प्रेमी नागरीक उपस्थित होते.असे वृत्त करंजमहात्म्य परिवाराला मिळाल्याचे संजय कडोळे यांनी कळवीले आहे.