वरोरा:---
सालोरी येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत ,महारोगी सेवा समिती द्वारा संचालित आनंद निकेतन कृषी महाविद्यालय , वरोरा येथील कृषिकन्यांनी अझोला निर्मिती प्रात्यक्षिकाचे आयोजन केले. ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यक्रमांतर्गत या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. अझोला, एक अद्भुत जलचर फर्न वनस्पती आहे. ती पाण्याच्या पृष्ठभागावर वेगाने वाढते.
शेतकऱ्यांना मर्यादित स्त्रोतांमुळे अनेकदा जनावरांसाठी पुरेसे खाद्य तयार करण्यासाठी संघर्ष करावे लागतात त्यांच्यासमोर अझोला हा योग्य पर्याय आहे.
अझोला हे गुरेढोरे, मासे, डुक्कर आणि कुक्कुटपालनासाठी एक आदर्श शाश्वत खाद्य आहे. याशिवाय, ते धानाच्या शेतात जैव खत म्हणून देखील वापरले जाते.
अझोला नायट्रोजन स्थिर करण्यात मदत करते. अझोला हा नत्राचा उत्कृष्ट स्रोत आणि उच्च पोषक मूल्य आहे.
अझोला लागवडीसाठी कमी गुंतवणूक आवश्यक आहे. त्यामुळे चांगल्या खाद्यासाठी आणि चांगल्या जैव खतासाठी हा कमी खर्चाचा पर्याय उपलब्ध आहे. पशुखाद्यामध्ये विविध पोषक घटकांचे संतुलित प्रमाण असणे आवश्यक आहे. त्यासाठी अझोल्याचा पशुखाद्यामध्ये वापर करणे फायदेशीर असल्याचे कृषिकन्यांनी सांगितले.
कृषिकन्या धनश्री किरसन, सुकन्या खडसकर, वैष्णवी नाकतोडे ,वैष्णवी मत्ते, पूजा खरात, मिताली नोमुलवार यांनी शेतकऱ्यांना अझोला निर्मितीविषयी माहिती दिली. यासाठी प्राचार्य डॉ. सुहास पोतदार , रावे प्रमुख डॉ. आर. व्ही. महाजन , कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. एम. पांचभाई , डॉ. पी .एन. राखोंडे, डॉ. एम. जी .जोगी,डॉ. एम. एन . पातोंड , डॉ.एस. जे . गाजरलावार, यांचे मार्गदर्शन लाभले.
मोहसिन सय्यद वरोरा
आपल्या प्रतिक्रिया द्या....