शासनात विलिनीकरण व्हावे या मागणीकरीता राज्य परिवहन बस कर्मचाऱ्याच्या बेमुदत काम बंद आंदोलन संपामुळे कारंजा बसस्थानकावरील चौकशी कक्षाला कुलूप लावून चौकशी कक्ष म्हणजेच वाहतूक नियंत्रण कक्ष बऱ्याच दिवसांपासून बंद करण्यात आलेला होता परंतु काही कर्मचारी कामावर रुजू झाल्यामुळे अमरावती वाशिम अकोला यवतमाळ येथून काही बसफेऱ्या सुरु करण्यात आलेल्या असून जवळ जवळ पाच महिन्याच्या दिर्घ कालावधी नंतर पुन्हा एकदा कारंजा बसस्थानकावर प्रवाशांची वर्दळ सुरु झालेली आहे . परंतु चौकशी कक्षच सुरू नसल्याने, प्रवाशांना चौकशी करता येत नव्हती त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेकडे तक्रारी केल्यात . प्रवाशांच्या तक्रारीची दखल घेत जिल्हाध्यक्ष संजय कडोळे, मोहम्मद मुन्निवाले, आरिफ पोपटे, विजय खंडार, उमेश अनासाने, हेमंत पापळे, गणेश बागडे, प्रज्ञानंद भगत, दामोधर जोंधळेकर, ज्ञानेश्वर शिंदे आदी पत्रकार मंडळींनी प्रसारमाध्यमाद्वारे सदरहु प्रश्नाला वाचा फोडली आणि पत्रकारांच्या मागणीची दखल घेत आगार प्रमुख मुकूंद नाव्हकर यांनी कारंजा बसस्थानकावरील चौकशी [ वाहतूक नियंत्रण ] कक्ष पूर्ववत सुरु करून तात्पुरत्या वाहतूक नियंत्रक अधिकारी यांची नियुक्ती केली व तसे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांना कळवीले . त्याबद्दल आज महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेने कारंजा बसस्थानकाला भेट देऊन, जिल्हाध्यक्ष संजय कडोळे, आरिफ पोपटे, मोहम्मद मुन्निवाले, ज्ञानेश्वर शिंदे, उमेश अनासाने आदींनी तात्पुरते वाहतुक नियंत्रक किंवा चौकशी अधिकारी इंद्रसिंग शालिग्राम राठोड यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला . व प्रवाशांना निस्पृह सेवा देण्याची विनंती केली .