तालुक्यातील पळसगाव घाटावरून बिनधास्त सुरू असलेली रेती चोरी करणाऱ्या तस्करा विरुद्ध सिंदेवाही पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. मंगळवारी सकाळी रेती तस्कराचे रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर सह ट्राली जप्त . ही कारवाई सोनापूर तुकुम या मार्गावर करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की , सिंदेवाही ठाणेदार घारे पेट्रोलिंग करता रात्रौ गस्तीवर असताना आज 14 जुन ला मंगळवारी सकाळी पहाटे पळसगाव सोनापूर -तुकुम या मार्गावर सापळा रचला तेव्हा थोड्याच वेळात सोनापूर -तुकुम मार्गावर येणाऱ्या एका ट्रॅक्टर ला पोलिसांनी थांबवून तपासणी केली असता. त्या ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये चोरीची रेती भरली आढळली.
सदर त्या ट्रॅक्टर चे पुन्हा तपासणी केली असता त्या ट्रॅक्टरवर लीहीलेला नंबर खोडलेल्या अवस्थेत होता. ट्रॅक्टर -ट्राली सह 1 ब्रास रेती असा एकुण
6 लाख 55 हजाराच्या मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सिंदेवाही ठाणेदार योगेश घारे, देवानंद सोनुले,रनधीर मदारे, मंगेश श्रीरामे यांनी केले आहे.