अखिल भारतिय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती संघटनेच्या नियामक मंडळाकरीता,सन २०२३ ते २०२८ या पंचवार्षिक वर्षाकरीता,रविवार दि.१६ एप्रिल रोजी मतपत्रिकेद्वारे लोकशाही मार्गाने निवडणूक घेण्यात आली. मुख्य म्हणजे सदर निवडणूक ही प्रस्थापित विरुद्ध बहुजनाची लढाई होती.निवडणूकीमध्ये दोन सदस्याकरीता एकूण आठ उमेद्वार उभे होते. व महत्वाचे म्हणजे बहुजन उमेद्वाराच्या भितीने,अ भा मराठी नाट्य परिषद ही शासकिय संस्था नसतांनाही,कारंजा स्थानिकच्या उमेद्वाराने भजनी कलावंताना नाट्यसंस्थेकडूनच,मानधन मिळवून देण्याची धादांत खोटी आश्वासने देऊन मते मिळविण्याचे प्रयत्न तर केलेच होते.शिवाय समाजाच्या बैठका लावून,मी निवडून येणे हा समाजाच्या अस्मितेचा प्रश्न आहे असा प्रचार करीत स्वतःच्या समाजाला एकत्र करीत गठ्ठा मते मिळविण्याचे सुद्धा अयशस्वी प्रयत्न केले होते.तसेच महत्वाचे म्हणजे आज मतदान केन्द्रावर सुद्धा बळजबरीने आपल्या उमेद्वाराला मते देण्याविषयी मतदारांना सांगीत,त्यांचे इमानदार समाज कार्यकर्ते मतदारांना केन्द्रात सक्तीने घेऊन जात होते.परंतु सदहू मतदानाचा निकाल हा संपूर्ण जिल्ह्याच्या मतदारावर आणि जिल्हयातील तिन मतदान केन्द्रावरील आकडेवारी मधून धरला जाणार होता.व त्यानुसार अखेर श्री गुरुमाऊली श्री नृसिह सरस्वती स्वामी वर नितांत श्रद्धा असणाऱ्या नंदकिशोर अंबादास कव्हळकर आणि उज्वल दत्तात्रय देशमुख या उमेद्वारांचा अखेर सलग दुसऱ्यांदा यशस्वी विजय झाला.सदरहू विजयाकरीता जिल्ह्यातील विधानपरिषदेचे आमदार अँड किरणराव सरनाईक,कारंजा येथील ज्येष्ठ राजकीय नेत्या सईताई डहाके, सुनिलभाऊ धाबेकर,माजी नगराध्यक्ष नरेंद्रजी गोलेच्छा,माजी नगराध्यक्ष अरविंदजी लाठीया,माजी नगराध्यक्ष विजय बगडे, ब्रिजमोहन मालपाणी,नगरसेवक प्रसन्ना पळसकर,गणेश बाबरे, हभप लोमेश पाटील चौधरी व चौधरीबंधू यांचे त्यांना बहुमोलाचे सहकार्य होते. तसेच महत्वाचे म्हणजे त्यांच्या प्रचाराची सर्व यंत्रणा राधाताई मुरकुटे,रविंद्र नंदाने,पांडूरंग माने, अश्विन जगताप,दिनेश कडोळे, डॉ इम्तियाज लुलानिया, रोमिल लाठीया, डॉ ज्ञानेश्वर गरड, अतुल धाकतोड यांनी सुद्धा यशस्वीपणे सांभाळली होती.नंदकिशोर कव्हळकर हे कारंजा तालुक्यात हास्यमुख,प्रामाणिक व मनमिळाऊ असून त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य म्हणजे कलावंताना खोटी आश्वासने देणे,त्यांची फसवणूक करणे व कुणाचा विश्वासघात करणे या गोष्टीची त्यांना प्रचंड चिड आहे.त्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण बहुजन समाजाच्या नाट्य कलावंताचे नेतृत्व म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्या वृत्तपत्रिय प्रचाराची संपूर्ण धुरा त्यांचे प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष तथा आमचे ज्येष्ठ प्रतिनिधी संजय कडोळे यांनी यशस्वीस्वीपणे सांभाळली व त्यांच्या अजोड लेखनशैली व अंदाजाप्रमाणे अखेर बहुजन नाट्यकलावंतानी जातिय समीकरणांना मूठमाती देत मतदान केले.आणि नंदकिशोर कव्हळकर व उज्वल देशमुख या उमेद्वारांना श्री गुरुमाऊली कृपेने विजयी घोषीत करण्यात आले.