विद्यार्थ्यांना लहान पणा पासुनच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व निर्माण करण्यासाठी प्रेरणा मिळून आत्मविश्वास वाढावा म्हणून डॉ पंजाबराव देशमुख कॉन्व्हेंट ब्रम्हपुरी येथे दहीहंडी, राखी मेकिंग या सारख्या स्पर्धा घेतल्या जातात त्याच प्रमाणे आज फॅन्शी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली त्या प्रसंगी संस्था अध्यक्ष प्रा प्रकाश बगमारे यांनी सहभागी 50 स्पर्धकाना शुभेच्छा दिल्या व भविष्यात वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन यशस्वी व्हावे अशी शुभेच्छा या प्रसंगी दिल्या.डॉ पंजाबराव देशमुख कॉन्व्हेंट मधील नीलिमा गुज्जेवार ,निशा मेश्राम,पिंकी ठाकरे ,मेघा राऊत ,रंजना कोहळे , वर्षा जीभकाटे ,अश्विता सयाम ,प्रगती शेंडे,नीलम शेडमाके, वर्षा काटेखाये,योगीता नंदनवार,संजय नागोसे,कामिनी कन्नमवार, घर्षणा सेलोकर यांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे संचालन वैशाली सोनकुसरे यांनी तर स्पर्धक , मान्यवर व पालक यांचे विशेष आभार प्रगती शेंडे यांनी मानले व सर्वांना शुभेच्छा दिल्या