कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे ): नुकतीच शासकिय विश्रामगृह कारंजा येथे अ भा महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मार्गदर्शक कृष्णराव गाडगे गुरुजी होते तर मार्गदर्शक म्हणून प्रा संतोष विरकर प्रदेश संघटक, रविभाऊ सोनवणे, प्रदेश प्रचारक विचारवंत डॉ नागेश गवळी, अमरावती विभागीय अध्यक्ष प्रा अरविंद गाभणे, जिल्हा संघटक गजानन टोम्पे प्रमुख अतिथी म्हणून हजर होते. यावेळी बोलतांना प्रा संतोष विरकर यांनी "ओबीसी आरक्षण कायम टिकले पाहीजे." यासाठी सक्रिय असण्याचे उद्बोधन केले.
प्रमुख मार्गदर्शकांनी ओबीसी आरक्षणाकरीता माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे अमुल्य योगदान असून त्यांचे पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. सदर बैठकीला येवता येथील तालुका सचिव गजानन लायबर, उंबर्डा बाजारचे सर्कल प्रमुख जी एल लायबर, तालुका संघटक दशरथ रोकडे, माळी युवा मंच वाशिमचे शशिकांत वेळुकार, खेर्डा येथील माजी सरपंच प्रदिप दुरतकर, कारंजा येथील विवेक जिचकार, युवा सामाजिक कार्यकर्ते सत्यजीत उर्फ बंटीभाऊ गाडगे, लिलाधर लांडगे, चंद्रकांत वर, प्रभाकर ढोरे, बाळू हळदे, रामचंद्र रावळे, गणेश यंदे, प्रकाश बागडे, युवा पत्रकार राजु श्यामसुंदर, हरिदास गुहाडे व पंचक्रोशीतील सर्वच ओबीसी समाज बांधव बहु संख्येने उपस्थित होते. आढावा बैठकीला ओबीसी समाज बांधवांची अभूतपूर्व एकजुट दिसून आली. या बैठकीचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक तालुकाध्यक्ष वसंतराव मारोटकर यांनी तर आभार कारंजा शहराध्यक्ष सुभाषचंद्र क्षिरसागर यांनी व्यक्त केले .