अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्थापनेच्या १९४९ पासून संपुर्ण भारतामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडविणे व त्यांचा मध्ये राष्ट्रा प्रती आणि समाजाप्रती आत्मीयता निर्माण करण्याचे कार्य सतत व निरंतर करत येत आहे. ह्या मध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रकारे मंच उपलब्ध करून त्यांचे व्यक्तिमत्व विकास करने व सेवेचे भाव त्यांचा मध्ये निर्माण करणे हा मुख्य उद्देश घेऊन जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना म्हणून कार्यरत आहे.
ह्याच विद्यार्थी संघटनेच्या कारंजा लाड शाखेच्या वतीने ७५ फूट भव्य तिरंगा यात्रेचे अयोजन करण्यात आले. ह्या मध्ये कारंजा शहरातील सर्व नामांकित शाळा व महाविद्यालयांचा उत्स्फूर्त पणे समावेश राहिला. ज्यामध्ये प्रामुख्याने सन्मती ज्ञानमंदिर इंग्लिश स्कूल द्वारे पर्यावरण रॅली, जे. सी. हायस्कूल द्वारे ग्रंथ दिंडी व कंकुबाई कन्या विद्यालय द्वारा विवीध वेशभूषा साकारून यात्रेच्या माध्यमातून अनेक सामाजिक संदेश देण्याचे कार्य करण्यात आले. यात्रेची सुरुवात सकाळी ८ वाजता श्री. गुरुमंदिर येथून होऊन समारोप झांसी राणी चौक येथे झाला. ह्या कार्यक्रमास अध्यक्षपदी नागवाणी इंग्लिश स्कूल चे संचालक विजय नागवाणी, प्रमुख वक्ते म्हणून अभाविप विदर्भ प्रांत चे प्रांत संघटन मंत्री विक्रमजीत कलाने, प्रमुख अतिथी म्हणून माजी सैनिक अतुल एकघरे तर प्रमुख उपस्थिती अभाविप वाशिम जिल्हा संयोजक कु. विजया मोरे उपस्थित होते. ह्या कार्यक्रमास ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग राहिला असुन सर्व विद्यार्थ्यांना भेट वस्तू सुद्धा देण्यात आले.
तसेच १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर पर्यंत चालविण्यात येणाऱ्या सदस्यता अभियानाची सुरूवात सुद्धा ह्या यात्रे मध्ये करण्यात आली. ह्या वेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपली अभाविप मध्ये सदस्यता करून घेतली. तसेच अभाविप चे विदर्भ प्रांत संघटन मंत्री श्री. विक्रमजीत कलाने ह्यांची सुद्धा सदस्यता कारंजा लाड शाखेच्या माध्यमातून करण्यात आली. कार्यक्रमाची समाप्ती वंदे मातरम् गीताने झाली.