कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या मार्फत दरवर्षी शासन मान्य अनुदानित शाळेत शिकणाऱ्या इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (एन.एम.एम.एस.) ही परीक्षा आयोजित करण्यात येत असते.
सदर शिष्यवृत्ती योजनांमध्ये उत्तीर्ण होऊन गुणवत्ता यादीत आल्यास सदर विद्यार्थ्याला वर्ग 9 पासुन 12 पर्यंत दरवर्षी 12000 रुपये शिष्यवृत्ती मिळते. तसेच या शिष्यवृत्ती उत्तीर्ण झालेले परंतु गुणवत्ता यादीत न आलेले कुनबी व मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सारथी शिष्यवृत्ती अंतर्गत शिष्यवृत्ती मिळते.
एन एम एम एस परीक्षाचे शाळा नोंदणी व विद्यार्थी नियमित विद्यार्थी नोंदणी ऑनलाईन पद्धतीने 25 जुलैपासून सुरू करण्यात आलेली होती व शेवटची तारीख 23 ऑगस्ट होती. सदर शिष्यवृत्तीचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मिळावा म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी ऑनलाइन शाळा नोंदणी व विद्यार्थिनी नोंदणीच्या तारखेला मुदतवाढ देऊन आता दोन सप्टेंबर 2023 पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन नामांकन सादर करणे करता येणार आहे.तरी वाशिम जिल्ह्यातील इयत्ता आठवी मधील शिकणाऱ्या अनुदानीत शासनमान्य शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी www.mscepune.in या वेबसाइट वर ऑनलाईन आवेदन पत्र सादर करावे, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे,उपशिक्षणाधिकारी आकाश आहाळे व विज्ञान अध्यापक मंडळाचे विजय भड यांनी केले आहे.