नवतळा येते एसटी बस पलटल्याने नव प्रवासी किरकोळ रित्या जखमी झाले असून वाहनचालकांच्या सतर्कतेने या प्रवाशांचे प्राण वाचले आहे. चिमूर नवतळा कांपा मार्गे ही बस नवतळ्या वरून निघाली गावाजवळील मजरा तलावाजवळ अचानकपणे वाहनचालक एम डी उईके यांना चक्कर आली त्यांनी त्याही परिस्थिती वाहनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु रस्त्याच्या कडेला जाऊन ही बस पलटली या बस मध्ये नऊ प्रवासी प्रवास करीत होते परंतु सुदैवाने कोणालाच गँभिर दुखापत झाली नाही बस पलटलयांतर आजूबाजूचे शेतकरी धावून आले त्यांनी प्रवाशांना व वाहनचालक व वाहक यांना बाहेर काढले घटनेची माहिती होताच आगार व्यवस्थापक एस टी शिंदे वाहतूक नियंत्रक सुरज मुन यांनी घटनास्थळी भेट दिली. वाहन चालकांला नागपूर येथे रेफर केल्याची माहिती आहे.