गिरीधरराव बोराखडे यांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन युवकांनी प्रेरणा घ्यावी - आमदार प्रकाश भारसाकडे
अकोला :- गिरधरराव बोराखडे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवकांनी प्रेरणा घेऊन समाजामध्ये कार्य करत राहावे असे प्रतिपादन अकोट मतदार संघाचे आमदार प्रकाश भारसाकडे यांनी कवी गिरीधरराव बोरखडे यांच्या कविता संग्रहाचे प्रकाशन प्रसंगी काढले
दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी रिंग रोकवी गिरीधरराव बोरखडे यांच्या शब्दबिंदूचे झिरपले या कवितासंग्रहाचे प्रकाशन सोहळा रिंग रोड स्थित जानोरकर मंगल कार्यालय अकोला येथे संपन्न झाले. कवी गिरीधरराव बोरखडे यांच्या शब्दबिंदूचे झिरपले या कवितासंग्रहाचे प्रकाशन सोहळा आयोजित केला होता त्यानिमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अकोट मतदार संघाचे आमदार प्रकाशजी भारसाकडे हे होते तर प्रकाशन शुभहस्ते आमदार रणधीर सावरकर अकोला पूर्व हे असून प्रमुख पाहुणे म्हणून तर आमदार अमोलजी मिटकरी सदस्य विधान परिषद महाराष्ट्र राज्य, तसेच माजी आमदार गुलाबरावजी गावंडे माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, तसेच जनार्दन बोथे सरचिटणीस अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम तसेच बाबासाहेब आवारे अध्यक्ष गुरुकुंज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण संस्था गुरुकुंज आश्रम तसेच माजी प्राचार्य एकनाथरावजी गावंडे श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती तसेच अँडवोकेट अनंतरावजी खेडकर सुप्रसिद्ध साहित्यिक, तसेच गणेशराव जाधव जिल्हा क्रीडा अधिकारी अमरावती, प्राध्यापक शत्रुघ्न बिडकर मुख्याध्यापक संघ राज्य उपाध्यक्ष आदी मान्यवर मंचकावर उपस्थित होते या सर्व प्रमुख पाहुण्यांचां सत्कार डवले पब्लिक स्कूल आणि डवले स्कूल ऑफ एज्युकेशन चे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश डवले सर यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे तसेच अध्यक्षांचे शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. उपस्थितीत कवितासंग्रह प्रकाशन सोहळा उत्तमरित्या पार पडला कार्यक्रमाचे संयोजक म्हणून चित्रपट लेखक दिग्दर्शक निलेशजी जळमकर सदस्य कोल्हापूर चित्रनगरी विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य हे उपस्थित होते, कार्यक्रमासाठी प्राध्यापक शिवकुमार खोडे तसेच प्रमोद राव ढवळे मंडळ अधिकारी अमरावती तसेच गोपाल निवाने अकोला आणि शिरीषराव ईचे तसेच प्रज्ञां इचे तसेच डवले कॉलेजच्या समस्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोला चे सहकार्य लाभले समस्त शब्दबिंदू झिरपले या कवितासंग्रहातील कवितांचे गेय स्वरूपात सादरीकरण प्राध्यापक माधव जऊळकर यांनी संगीतबद्ध केल्या असून गीत रचना गिरीधरराव बोरखडे यांची होती कवींच्या कविता ह्या संगीतबद्ध करून प्राध्यापक माधवराव जऊळकरांनी त्या कवितांना एक नवा साद दिला तसेच. सामाजिक जाणीवेच्या कवितेच्या माध्यमातून गेय स्वरूपात मांडताना जऊळकरांनी उत्तम चाल देऊन कवितेला सौंदर्य प्रदान केले आहे. तसेच तसेच गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम येथील सर्व सेवाभावी सहानुभाव कार्यक्रमाला उपस्थित होते गिरीधर रावजी बोरखडे यांचे शब्दबिंदू झिरपले हा कवितासंग्रह एका सामाजिक जाणवेच्या कविता घेऊन तसेच शेतकरी जीवनावर आधारित कविता त्यांच्या जीवनातील सुखदुःख कवींनी आपल्या कवितेतून मांडलेले आहे. कार्यक्रमासाठी प्रा. प्रकाश डवले सर मुख्याध्यापिका मृणालीताई डवले तसेच प्राध्यापक शिवकुमार खोडे भावनाताई खोडे तसेच श्री प्रमोदराव ढवळे सर, राधाताई ढवळे, गोपाल निवाने, वैशाली निवाने, शिरीष ईचे, प्रज्ञा ईचे, आनंद खोडे, डॉक्टर अभिजीत डवले, डॉक्टर आदित्य डवले, ओम खोडे, कृष्णा ढवळे, श्रावणी ढवळे, प्रफुल्ल कानकीरड, विशाल कांबळे,सतीश गिरी, महेश इंगळे, किशोर बळी, अमोल गोडंचवर, हिम्मत ढाळे, निलेश कवळे, राजेंद्र जळमकार, गजेंद्र काळे सदाशिव शेळके, रमेश गोतमारे, अनिल मालगे,आदींचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला अकोला जिल्ह्यातील कवी व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....