मुल येथील एमएआयडीसी परिसरातील राजुरी स्टिल अँड आलोय इंडिया प्राव्हेट लिमिटेड कंपनीत जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्र सिंग परदेशी यांच्या उपस्थितीत नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्षारोपण करणे हे पर्यावरणाचे दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे. ज्यामध्ये आपण वृक्ष जितके जास्त लावू तेवढी पृथ्वी हिरवीगार होऊन ऑक्सीजन युक्त शुद्ध हवा मिळेल त्याचप्रमाणे प्रदूषण कमी होऊन उन्हापासून संरक्षण मिळेल तसेच पृथ्वीचे तापमान नियंत्रित होण्यास मदत होईल हाच उदात्त हेतू समोर ठेऊन राजुरी स्टिल अँड आलोय इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
. यावेळी विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले. चंद्रपूर जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्र सिंग परदेशी यांचा हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्यावेळी कंपनीचे डायरेक्टर विवेक जैन, व्ही. पी. सुमीत खेमका तसेच मुख्य व्यवस्थापक मनीष रक्षमवार तसेच कंपनीतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.