शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या संघर्ष ग्रस्त बालकांसाठी कार्य करणाऱ्या बाल न्याय मंडळावर अॕड.वैशाली गावंडे व अॕड.सारीका घिरणीकर या अकोल्यातील दोन सुप्रसिध्द महिला वकीलांची निवड करण्यात आली आहे.महिला व बाल विकास विभागाच्या निवडसमीतीने ही निवड केली असून या नियुक्तीची महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात नोंद करण्यात आली आहे.
अकोल्यात न्याय क्षेत्रासोबतच सामाजिक प्रवाहात कर्तव्य आणि संवेदनशिलतेने सामाजिक योगदान देणाऱ्या ह्या महिला वकील असून त्यातील अॕड.वैशाली गावंडे ह्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे केन्द्रीय उपाध्यक्ष श्री.किशोरभाऊ मानकर यांच्या भगिनी आहेत. त्यांच्या पूर्वी अॕड.अनिता गुरव व अॕड.संजय सेंगर या मंडळावर कार्यरत होते.या मावळत्या सदस्यांकडून अॕड.गावंडे व घिरणीकर यांनी नुकताच पदभार स्विकारला आहे.दोन्ही महिला वकीलाने न्याय व सामाजिक क्षेत्रातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.