कारंजा ( जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे ) : जिल्ह्यात 29 जून रोजी मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सण चंद्रदर्शनानुसार एक दिवस मागे पुढे साजरा केला जाणार आहे. बकरी ईद च्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यांनी मुस्लिम बांधवाना बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या असून आनंदात साजरा करण्याचे सांगतानाच, सद्यस्थितीत विविध राजकीय पक्ष,संघटना,सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून वेगवेगळ्या मागण्याकरिता धरणे प्रदर्शन, आंदोलनं ,उपोषणं करण्यात येत आहे. जिल्हा सण व उत्सवाच्या दृष्टीने तसेच राजकीय दृष्टीने संवेदनशील आहे. त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखणे सोयीचे व्हावे, यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) अन्वये 29 जूनपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जिल्हा दंडाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी लागू केले आहे.