वाशिम : दिव्यांग हा देखील समाजाचा महत्वपूर्ण घटक असून,लोकशाहीमध्ये महत्वपूर्ण म्हणून ओळखला जाणारा मतदार राजा आहे. शारीरिक किंवा मानसिक व्याधीमुळे जन्मतः किंवा अपघाताने दिव्यांग झालेल्या बऱ्याच दिव्यांगाना बरेचदा दिव्यंगत्वामुळे स्वतःच्या उदरनिर्वाहा करीता रोज मजूरी देखील करता येत नाही व त्यामुळे अखेर सर्वार्थाने त्याला शासकिय अर्थसहाय्यावरच अवलंबून रहावे लागते ही १००% वस्तुस्थिती आहे. सध्या अनाथ, बेघर,निराधार असलेल्या दिव्यांगाच्या उदरनिर्वाहाकरीता, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालय विभागामार्फत, "स्व संजय गांधी अपंग अनुदान योजना" चालविल्या जात असून,सदर योजनेद्वारे दिव्यांगाना दरमहा अर्थ सहाय्य दिले जाते. परंतु दिव्यांग बांधवाचे शिक्षण, रोजगार, व्यवसाय इत्यादी क्षेत्रात पुनर्वसन होणे सुद्धा गरजेचे होते त्यामुळे प्रहार दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ उर्फ ओमप्रकाश कडू यांच्या नेतृत्वात दिव्यांगाच्या न्याय्य हक्काकरीता बरीच निर्णायक आंदोलने केली. तसेच राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची मागणीही रेटून धरली. अखेर आ.बच्चुभाऊ कडू यांच्या मागणीला यश मिळून राज्यात दि ०९ जानेवारी २०२३ रोजी,स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात येऊन, त्याकरीता अद्यापपर्यंत स्वतंत्र कॅबिनेट मंत्र्याचे पद निर्माण न करता, दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष पदाची निर्मिती करून, अध्यक्ष म्हणून आ. बच्चुभाऊ कडू यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे निराधार अनाथ दिव्यांगाना आ. बच्चुभाऊ कडू यांच्या अध्यक्षपदी वर्णी झाल्याने, वाढत्या महागाईला अनुसरून अनुदानात वाढ होण्याची आशा निर्माण झाली. शिवाय बोलण्याच्या ओघात दिव्यांग मेळाव्या मधून बोलतांना आ. बच्चुभाऊ कडू यांनी सुद्धा स्व.संजय गांधी अपंग अनुदान योजनेत वाढ करून, तिन हजार रुपये महिना करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे ही वाढ सार्वत्रिक निवडणूकापूर्वी किंवा अर्थसंकल्पिय अधिवेशनात होणे अपेक्षित होते.मात्र तसे झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे निवडणूकीच्या रणधुमाळीत इतर योजना बाबत निर्णय घेण्याचा धुमधडाका सुरु असतांना मात्र दिव्यांगाच्या मागण्याची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शासनाने प्रतारणाच केली असल्याचे मत महाराष्ट्र अपंग संस्थेचे उपाध्यक्ष कासम मुन्निवाले,अरविंद गुंठेवार, राजकुमार आगरकर,इम्तियाज अजिजशहा, हसन पटेल, रमजान बेनीवाले इत्यादींनी म्हटले आहे.