कारंजा [ लाड ] :वाशिमवरून कारंजाकडे शासकीय वाहनाने येत असतांना, पोलिसांच्या वाहन क्रमांक MH37AD3057 या वाहनाच्या डाव्या बाजूचा टायर फुटल्याने, पोलिसांची गाडी पल्टी होऊन त्यामध्ये असलेले आठ पोलीस अंमलदार हे जखमी झाले .
असून जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह (IPS) यांनी लगेच अपघातस्थळाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. सर्व पोलीस अंमलदारांची प्रकृती चांगली असल्याचे सांगीतले जात असले तरी अपघातामुळे पोलिस व माहिला शिपायांना दुखापत होऊन ते जखमी झाल्याचे वृत्त महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेला मिळाल्याचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे .