कारंजा तालुक्यातील नदी, नाले, पाझर तलाव यांच्या काठावरील व डाबरीच्या शेतातील बहुतांश शेत जमिन ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात दररोज झालेल्या अतिवृष्टी पावसाने किंवा ढग फुटीसदृश्य कोसळलेल्या पावसाने एकतर पिकासकट खरडून गेलेली आहे. किंवा शेतात पाणीच पाणी साचलेले असल्याने शेतातील सर्वच सोयाबिन, तुर, कपाशी इत्यादी पिक सडून निकामी झालेले असून अक्षरशः शेतकरी राजाचे तर, निसर्गाच्या भयंकर कोपाने पूर्ण पणे दिवाळेच निघाले आहे. ऐन दिपावलीच्या तोंडावर त्याचं कापणीला आलेलं सोयाबिन नष्ट झालं आहे. त्यामुळे आता कारंजा तालुक्यातील शेतकऱ्याचा अंत न पहाता मायबाप सरकारने ताबडतोब कारंजा तालुका ओला दुष्काळ ग्रस्त जाहिर करून नुकसान भरपाई दिली पाहीजे अशी मागणी धोत्रा जहाँगीर येथील शेतकरी शांताराम पवार यांनी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषद वाशिम यांचेकडे केल्याचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.