कारंजा : कारंजा शहरात कायदा व सुव्यवस्थेकरीता, कारंजा पोलिस स्टेशनकडून अतिरिक्त पोलिस तुकड्या मागविण्यात आलेल्या असून, जिल्हा पोलिस अधिक्षक मा बच्चनसिह यांचे नेतृत्वात पोलिसांचा खूप मोठा रुट मार्च कारंजा शहरातून प्रमुख मार्गाने काढण्यात आला.
यावेळी मा बच्चनसिह यांनी, कारंजा शहरात स्थानिक नागरिकांनी शातंता व सलोखा राखण्याचे आवाहन करीत सर्वांना रमजान ईद निमित्ताने शुभेच्छा दिल्या .व आपल्या संरक्षणाकरीता पोलीस विभाग सतर्क असल्याचे आवाहन केले . रूटमार्च मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी, कारंजा शहराचे ठाणेदार आधारसिह सोनोने, सहाय्यक पोलिस निरिक्षक, दंगापथक, निर्भया पथक यासह गृहरक्षक दलाचे कर्मचारी सहभागी झाले होते असे प्रत्यक्षदर्शी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे तथा दामोधर जोंधळेकर यांनी कळविले आहे .