कारंजा : स्थानिक कारंजा येथील सन्मती ज्ञान मंदिर यांनी दर्पणकार कै.बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ साजरा करण्यात येत असलेल्या राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आगळावेगळा व कारंजाच्या इतिहासात पहिल्यांदाच पत्रकार सन्मान सोहळा आणि परिसंवाद हा कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी कारंजा येथील पहिल्या स्त्रीरोग तज्ञ तथा कारंजा नगर परिषदेच्या माजी सभापती डॉ.श्रीमती आशालता कांत ह्या होत्या.तर प्रमुख अतिथी म्हणून कारंजा शहरातील सर्वधर्म आपात्कालिन संस्थेचे श्याम सवाई,महाराष्ट्र शासन पुरस्काराने सन्मानित असलेले करंजमहात्म्य परिवाराचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे,विदर्भ न्यूजचे अक्षय लोटे,विजय गागरे,अंकुश कडू,एकनाथ पवार,किरण क्षार,आरिफ पोपटे,हमिद शेख,बंडूभाऊ इंगोले, अभय खेडकर,फिरोजभाई शेकूवाले,प्रफुल बानगावकर,सुनिल फुलारी,विजय काळे,सुधिर देशपांडे,समिर देशपांडे,अमोल अघम,मनिष भेलांडे, योगेश यादव,विजय भड इ.प्रतिष्ठित पत्रकार होते. यावेळी सर्वप्रथम दि.12 जानेवारी रोजी उद्याला साजरे होणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब जयंती आणि युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद जयंती निमित्त मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन व महापुरुषाच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.त्यानंतर पत्रकारांना सन्मानपत्र आणि वृक्षांची रोपे देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.

त्यानंतर याप्रसंगी विविध चर्चा झाल्या. चर्चेदरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी पत्रकारांना आपल्या मनातील प्रश्न विचारून त्याचे निराकरण करून घेतले.अनेक प्रश्नांची उत्तर देत असताना पत्रकारांना सुद्धा यात खूप आनंद येत होता.हा आगळावेगळा कार्यक्रम कारंजा शहरात पहिल्यांदाच सन्मती ज्ञानमंदिर या शिक्षण संस्थेकडून साजरा झाला असून वेगवेगळ्या पत्रकार संघटनेचे आणि प्रिन्ट मिडीया व इलेक्ट्रॉनिक्स मिडियाची पत्रकार मंडळी एकाच मंचावर एकत्र आलेली होती.
त्यामुळे सगळ्या पत्रकारांनी समाधान व्यक्त केले.तसेच पत्रकारांच्या भावना समजून घेतल्यामुळे समाधान व्यक्त करीत शाळेचे आभार मानले.
याप्रसंगी शाळेच्या संचालिका गुंजन चवरे,आमोद चवरे आणि सन्मती ज्ञान मंदिराच्या मुख्याध्यापिका तथा शिक्षक वृंद यांनी पत्रकारांचा योग्य सन्मान केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या सोनाली कळंबे मॅडम यांनी,सुत्रसंचलन शिक्षीका सौ.संगीता रवणे मॅडम,सौ.वंदना चवरे मॅडम,अध्यापक निलय बोंते सर,विठ्ठल ठाकरे सर यांनी तर आभार प्रदर्शन प्राजक्ता इंगोले मॅडम यांनी केले. कार्यक्रमाला संचालक,शिक्षकवृंदासह विद्यार्थी विद्यार्थीनीची लक्षनिय उपस्थिती होती.
आपल्या प्रतिक्रिया द्या....