वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : जिल्हा जातीय व राजकीयदृष्टया संवेदनशील आहे. आगामी काळात 29 जून रोजी मुस्लीम धर्मियांचा बकरी ईद उत्सव आणि हिंदू धर्मियांचा आषाढी एकादशी हे सण साजरे करण्यात येत आहे. सामाजिक माध्यमाव्दारे आक्षेपार्ह संदेश प्रसारीत झाल्याने काही ठिकाणी वेगवेगळया कारणावरुन जातीय तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. आगामी सण-उत्सव काळात एखाद्या व्यक्तीकडून समाज माध्यमात आक्षेपार्ह संदेश/ व्हिडीओ प्रसारीत झाल्यास जातीय सलोखा आणि कायदा व सुव्यवस्था बाधीत होऊ नये व जिल्हयात शांतता अबाधित राहावी, यासाठी 7 जुलैपर्यंत फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 चे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी लागू केले आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्तींविरुध्द कारवाई करण्यात येईल. असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.