कारंजा - दि. 15 ऑगस्ट 2024
येथील श्री म. ब्र. आश्रम हायस्कूल मध्ये भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला . या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्री म. ब्र. आश्रम हायस्कूलचे शाळा समिती अध्यक्ष श्री परिमल भाऊ रुईवाले तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष सुहास भाऊ चवरे, संस्थेचे विश्वस्त पियुष भाऊ डोणगांवकर, तसेच अमेरिकेचे सॉफ्टवेअर इंजिनियर तुषार भाऊ ठवळी, शाळेचे माजी संस्कृत शिक्षक आलोकजी घोडके सर, मुख्याध्यापक प्रकाशजी सरोदे सर तर प्रमुख वक्ता म्हणून रणजीत वाकळे सर हे मंचावर उपस्थित होते.
सर्वप्रथम पाहूण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर शाळेचे शिक्षक प्रजय गहाणकारी सर यांच्या मार्गदर्शनामध्ये राज्य गीत तसेच ध्वजगीत विद्यार्थ्यांनी अतिशय सुरेख आवाजात म्हटले. पाहुण्यांचे स्वागत समारंभ झाल्यानंतर सर्वप्रथम _ऐ मेरे वतन के लोगों_ हे गीत तक्षशिला इंगोले, कल्याणी जाधव, आरती घोडराव, ऐश्वर्या राठोड, कोमल राठोड या विद्यार्थिनींनी सादर केले व त्यानंतर भाषणाच्या क्रमामध्ये वर्ग 10 वी चा ध्रुप राठोड या विद्यार्थ्याने जर्मन भाषेत स्वातंत्र्य दिनाविषयी भाषण केले तर कु. राधिका कांबळे या विद्यार्थिनीने संस्कृत भाषेतून वैष्णवी ताठे हिने हिंदीतून तर अथर्व तवकार याने इंग्रजीतून भाषण केले त्यानंतर सृष्टी खाडे, अवंतिका ठाकरे, आस्था पवार, मृणाल चव्हाण, भूमिका बोरकर, नंदिनी होडगीर, जानवी ढोके या वर्ग 9 च्या मुलींनी देशभक्तीपर सुंदर नृत्य सादर केले. त्याचप्रमाणे वर्ग आठवीतील ऐश्वर्या राठोड, नताशा जयदे, मनस्वी बलंग, मानवी रोकडे, कोमल राठोड, नयना ठाकरे, खुशी सराफ, ज्ञानेश्वरी दोरक या विद्यार्थिनींनी देखील सुंदर देशभक्तीपर नृत्य सादर केले.
त्यानंतर प्रमुख वक्ते वाकळे सर यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यापुढे वर्ग आठवी ब च्या विद्यार्थिनींनी _लहरा दो_ हे उत्कृष्ट गीत सादर केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व अमेरिका निवासी तुषार भाऊ ठवळी यांनी विद्यार्थ्यांसमोर आपले प्रेरक मनोगत व्यक्त केले. शाळेचे मुख्याध्यापक .प्रकाश सरोदे सर यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त असे मार्गदर्शन केले सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे संचलन इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी कु. अक्षरा सोनवणे हिने तर आभार प्रदर्शन कु. आस्था चोपडे हिने केले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठान्न वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी माजी विद्यार्थी व मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....