वाशीम : यंदा महाराष्ट्र राज्यातील कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र,मध्य महाराष्ट्र, मराठवाडा,खान्देशसह पूर्व व पश्चिम विदर्भाच्या सर्वच भागात गेल्या पन्नास वर्षात किंवा आमच्या हयातीत आजपर्यंत केव्हा झाला नाही, यावर्षी एवढा धुवाँधार,ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी मुसळधार पाऊस झाल्याने नदी नाले शेतजमिनी व गावखेडी एक होऊन, शेतकऱ्याच्या जमीनीचे व पिकाचे 'होत्याचे नव्हते झाले आहे.' शेतकऱ्यांच्या संपूर्ण जमिनी पिकांसहच नव्हे तर माती सह खरडून गेलेल्या आहेत.अनेकांच्या शेताची तळी होऊन शेतात पाणीच पाणी झाल्याने यंदा शेतकऱ्याचे नगदी पिक सोयाबीन सह,मुग,उडीद,तुर, ज्वारी,कपाशी इत्यादी पिके नष्ट झालेली आहेत.किंवा सडून - गळून गेलेली आहेत.सर्व प्रकारचा भाजीपाला,वेली, फुलबागा,फळबागा नष्ट झाल्या असून त्यांच्या पासून उत्पन्नाची आशा धूसर झाल्याचे शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा महापूर वहात आहेत.जगाचा पोशिंद्या शेतकऱ्यांची निसर्गापुढे हिमंत हारलेली आहे.आसमानी संकटाने तो पूर्णतः हताश झाला आहे.अतिवृष्टीच्या पाण्यामध्ये, ढगफुटीच्या महापूरामध्ये त्याची व त्याच्या कुटुंबाची स्वप्ने बुडून गेली आहेत.शेतकरी,शेतमजूर व शेतिमालावर अवलंबून रोजगार करणाऱ्या सर्वांवर बेरोजगारीचा डोंगर कोसळला आहे.त्यामुळे शासनाने राज्याची व त्यासोबतच वाशीम जिल्ह्याची परिस्थिती लक्षात घेवून सर्वांना तातडीची मदत द्यावी. कोणत्याही जिल्ह्यावर अन्याय न होऊ देता, प्रांता प्रांतात किंवा जिल्ह्या जिल्ह्यात भेदभाव न करता,संपूर्ण राज्यासाठी सरसकट 'ओला दुष्काळ' जाहीर करून, राज्यातील शेतकऱ्याची कर्जमाफी ; सर्वांना सरसकट नुकसान भरपाई आणि ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर प्रत्येकाला जिवनावश्यक अन्न, धान्य,किराणा,शैक्षणिक व आरोग्य विषयक सवलती, विजबील माफी देवून जगाच्या पोशिंद्याला बळ देवून,
परत स्वतःच्या पावलावर उभे करण्याची मागणी कारंजा येथील,राज्य शासन पुरस्कार प्राप्त शेतकरी मित्र दिव्यांग जनसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी शासनाकडे केली आहे.