शहरातील जटपुरा गेट परिसरात भरधाव रिक्षाची धडक बसल्याने एका 65 वर्षीय वृद्ध व्यक्ती जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. प्रकाश खोडे (वय 65, रा. जलनगर) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.
खोडे हे जटपुरा गेट जवळ रस्त्या पार करीत असताना त्याचवेळी भरधाव रिक्षाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत ते दुसऱ्या दुचाकीजवळ फेकले गेले. यात प्रकाश खोडे जखमी झाले. हा अपघात सिसीटीव्हीत कैद झाला आहे. रिक्षा चालकाने बेजबाबदार पणे वाहन चालवल्याने हा अपघात घडल्याचे व्हिडिओ तून दिसून येत आहे. नवरात्री च्या खरेदीनिमित्त चंद्रपूर शहरात गर्दी वाढली आहे. यामुळे रस्त्यावर वाहतूक खोळंबत आहे. रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.