कारंजा (लाड) : देवोके देव महादेव,भुतोके नाथ भूतनाथ, कालोके काल महाकाल यांच्या महाशिवरात्रोत्सवा निमित्त, दरवर्षी प्रमाणे यंदाही सलग ४१ व्या वर्षी कारंजा येथील बायपासस्थित शिवाजी महाराज नगराला लागून असलेल्या सारंग तलावा नजिकच्या हिंदु स्मशानभूमीमध्ये कारंजा येथील समाजसेवेचा अखंड वसा चालविणाऱ्या प्रतिष्ठित व सेवाव्रती डेंडूळे परिवारातर्फे बुधवारी दि.२६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्रोत्सव व भजनी जागराचा संस्मरणीय कार्यक्रम साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्वप्रथम सकाळी स्मशानभूमितील भगवान शिवशंकरजींच्या मुर्तीला दुग्धाभिषेक घालण्यात आला असता पंडीत मुकूंद महाराज जोशी यांनी शिव प्राणप्रतिष्ठा आणि पूजाविधी पार पाडला. तर रात्रीला संपूर्ण रात्रभर स्व. प्रल्हाद वाल्मिक भजन मंडळ कारंजा आणि डेंडूळे परिवाराच्या वतीने भजनी जागर कार्यक्रम साजरा केला.याप्रसंगी विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी स्व. प्रल्हाद वाल्मिक भजन मंडळ कारंजाचे अध्यक्ष महाराष्ट्र शासन दलितमित्र पुरस्कार प्राप्त आदर्श लोककलाकार रामबकस डेंडूळे यांचे शाल श्रीफळ देवून स्वागत केले व उपस्थित शिवभक्तांचा चहापान केला.तसेच स्मशानभूमी ही शांत व पवित्र जागा असून देवाधिदेव महादेवाची तपस्या भूमी असून अंधश्रद्धेवर प्रहार करण्याकरीता अशा प्रशंसनीय कार्यक्रमाची समाजाला जागे करण्यासाठी आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. याप्रसंगी माजी आमदार पुत्र बन्टीभाऊ डेंडूळे,राजेश डेंडूळे, गोपी डेंडूळे , निलेश डेंडूळे, अमित डेंडूळे, चेतन डेंडूळे, पवन बोर्डे, शिंदे महाराज, भानू डेंडूळे, रोहित डेंडूळे, पवन जाधव, धिरज पिवाल, लालू गोहर,राजा गोहर, सामाजिक कार्यकर्ते प्रदिप वानखडे, सुधाकर इंगोले,जिगनेश लोडाया,इत्यादी सह मोठ्या संख्येने असंख्य शिव भक्तांची प्रामुख्याने उपस्थिती होती.सुशोभित विद्युत रोषनाईने स्मशान भूमिमध्ये भजनी संगीताचे तालासुराने चांगलीच रंगत आणली होती.संपूर्ण रात्रभर हिंदु स्मशानभूमित शिव अवतरणाचा दुर्मिळ आनंदोत्सव साजरा केल्या जात होता.