चंद्रपूर:-
सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समिती व वनविभागाचे अधिकारी यांनी एकमेकांना सहकार्य करावे.
या करिता मा.जिल्हाधिकारी साहेब चंद्रपुर यांनी दि.15/03/2022 रोजी दुपारी 12-00 वाजता 20 कलमी सभागृहात बैठक पार पडली.1.सामुहीक वनहक्क व्यवस्थापन समितीला ठरवुन दिलेल्या प्रमाण गोणी विषय चर्चा करण्यात आली.
2.वनविभागाने ठरवुन दिलेल्या क्षेत्राअंतर्गत व क्षेत्राबाहेरचा तेंदु पत्ता तोडण्यासंबंधात चर्चा करण्यात आली.
3.सिंदेवाही, सावली तालुक्यातील काही गावांतील जंगल लिलाव वनविभागाने केल्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी मा.जिल्हाधिकारी साहेब यांनी उपवनसंरक्षक यांना बैठक लावून तोडगा काढण्यासाठी सांगीतले.
4.नव्याने सामुहिक वनहक्क दावे दाखल करण्यात येत असलेल्या गावांची माहिती द्यावी. त्याकरिता संबंधित यंत्रणांना सहकार्य करण्यासाठी सुचना देण्यात येतिल असेही जिल्हाधिकारी साहेब यांनी सांगितले.
5.सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समितीला सर्वांनी सहकार्य करावे असे मा.जिल्हाधिकारी साहेब यांनी सांगितले.
सभेला उपवनसंरक्षक ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी, वनपरीक्षेत्र अधिकारी ब्रह्मपुरी, सिंदेवाही व मा.सुधाकरजी महाडोरे सदस्य जिल्हास्तरीय कंन्वर्जन्स समिती रा.मेंडकी
सौ.सुषमा मोहुर्ले ग्रामसभा महासंघ अध्यक्ष रा.कळमगाव मा.राजेश पारधी ग्रामसभा महासंघ सचिव रा.मालडोंगरी श्री.तळशिदास काटलाम कोषाध्यक्ष ग्रामसभा महासंघ रा.वायगाव श्री.परशुराम सलामे रा.मरेगाव ता.सिंदेवाही ,श्री.स्मितकुमार वलादे सरपंच तांबेगडी मेंढा ता.सिंदेवाही,सौ.सुनिता गावंडे सरपंच घोट ता.सिंदेवाही,श्री.नानु शेंडे पवनपार,रोशन करकाडे सावरगाठा,स्वप्निल शेडमाके कन्हाळगाव,श्री.रनविर ठाकरे सचिव गणेशपुर व समिती सदस्य उपस्थित होते
आपल्या प्रतिक्रिया द्या....