अकोला:- स्थानिक तुकाराम चौक ते मलकापूर रस्त्या साठी सात वर्षापासून दयनीय अवस्था असून अनेक अपघात सुद्धा झालेले आहेत. तरीसुद्धा शासनाने हा रस्ता राजकीय श्रेयासाठी अडवून ठेवलेला आहे.या परिसरातील नागरिक या खड्ड्यामय रस्त्यामुळे त्रस्त झाले असून हा रस्ता व्हावा म्हणून निर्भय बनो जन आंदोलन व नगरसेवक मंगेशभाऊ काळे मित्रमंडळाच्या वतीने हा रस्ता त्वरित व्हावा म्हणून शासन, प्रशासनास , जनप्रतिनिधी यांना पाच वेळा निवेदन दिले आहेत. तसेच अनेक वेळा आंदोलने केली आहेत. परंतु शासनाने आश्वासने देऊन आंदोलने संपवली परंतु तुकाराम चौक ते मलकापूर रस्त्याचे काम अद्याप पर्यंत पूर्ण न झाल्यामुळे नाईलाजने दिनांक 29 जानेवारी 2024 वार सोमवार पासून आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा सहावा दिवस तरीही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही व या रस्त्याचे काम मंजूर असताना सुद्धा सुरू केले जात नाही. कारण स्थानिक आमदारांनी अधिकाऱ्यांना तंबी दिल्यामुळे ,सांगितल्यामुळे ठेकेदारास जाणून बुजून वर्क ऑर्डर दिला जात नाही. याच्या विरोधात मराठायोद्धा समाजसेवक व निर्भय बनो जन आंदोलनाचे संयोजक गजानन हरणे, तसेच नगरसेवक मंगेश काळे मित्र मंडळाचे संयोजक प्रमोद धर्माळे, शिवसेना शहर सचिव अविनाश मोरे हे या रस्ता , पाईपलाईन दुरुस्ती व स्ट्रीट लाईट ची कामे त्वरित पूर्ण व्हावी म्हणून सहा दिवसापासून आमरण उपोषण करीत आहेत.

उपोषणकर्त्यांची डॉक्टराणी तपासणी केल्यानंतर उपोषणकर्त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगून त्यांना दवाखान्यात भरती होण्याचा सलाईन औषध घेण्याचा सल्ला दिला .परंतु तो उपोषणकर्त्यांनी नम्रपणे नाकारून जिथपर्यंत काम चालू होत नाही तिथपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार जाहीर केला. आजा निगरमट्ट झोपेच सोंग घेतलेल्या प्रशासनाच्या विरोधात आंदोलकांच्या वतीने गुरुदेव सेवा मंडळ मलकापूर रुखमणी भजन महिला मंडल व्ही एच कॉलोनी भजन आंदोलन ,देशभक्तीपर गीत गाऊन प्रशासनाचा विरोध करण्यात आला, प्रशासनाचा निषेध करून आंदोलनाला पाठिंबा दिला, उपोषण मंडपात जगद्गुरु तुकाराम महाराज जयंती विविध मान्यवरांच्या उपस्थिती साजरी करण्यात आली.आज अनेक सामाजिक संस्था संघटनांनी पाठिंबा दिला त्यामध्ये शरद पवार राष्ट्रवादी पार्टी, काँग्रेस पार्टी, अजित पवार राष्ट्रवादी पार्टी, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, ज्येष्ठ नागरिक संघ, शिक्षक संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कस्टमाई संघटना,आरोग्य रुग्ण सेवा समिती, समता परिषद, देशमुख समाज संघटना, गुरुदेव सेवा मंडळ, सरपंच संघटना, कुणबी संघटना, चर्मकार संघटना, कोळी महादेव संघटना, पाटील समाज संघटना, अशा विविध राजकीय सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन या आमरण उपोषणाला पाठिंबा दिला व शासनाचा निषेध व्यक्त केला.तसेच उपशनस्तळी स्वाक्षरी अभियानाचे बोर्ड लावलेले आहे त्यावर हजारो लोकांनी आपल्या समर्थनाच्या सह्या मारलेल्या आहेत. तसेच जनजागृती रथ तयार करण्यात येऊन स्थानिक प्रशासन व जनप्रतिनिधीच्या विरोधात प्रभागात जनजागृती करीत फिरत आहे .अशा प्रकारचे अनेक विविध आंदोलने या उपोषणाच्या समर्थनार्थ आज दिवसभर झाले तसेच आज साखळी उपोषण केले.त्यामध्ये मंगेश काळे, कमलजीत कौर, मनोज राठोड, केदार खरे, प्रफुल्ल आडे , ओम राठोड,निलेश काळंके, सतीश मदनकार, संतोष रंगे, जनार्दन राऊत, विलास शिंदे , मधुकरराव वाकोडे, नंदकिशोर गावंडे, केल्विन सीबी, संदीप ढोले, विजय दुर्योधन, बंडू सवंई, जयसिंग ठाकूर, दादाराव पाथरीकर बाळू पाटील ढोले ललित जानोरकर, किसनराव कावरे, संजय दशमुखे, भुजंगराव देशमुख, संजय काळंके, रामराव देशमुख, हरिदास राऊत, सदानंद चिकटे यांच्यासह साठ लोकांनी साखळी उपोषण केले. तसेच निगरमट्टा भ्रष्टाचारी शासनास जागृत करण्याकरता ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो म्हणून नाविन्यपूर्ण आंदोलने करण्यात आले. राजकीय नेत्यांनी श्रेयासाठी हा लढा चालू ठेवू नका श्रेय कोणीही घ्या परंतु जनतेची होणारे हाल थांबवा श्रेयासाठी उपोषणकर्त्यांचे जीव वेठीस धरू नका. स्थानिक आमदारांनी हे काम करू नय अशी संबंधित अधिकाऱ्यांना तंबी दिलाचे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर आम्हाला सांगितले आहे त्यांच्यामुळेच काम लेट होत असल्याचे सांगितले त्याची संपूर्ण परिसरात चर्चा चालू झाली आहे. त्याचा मी जाहीर निषेध करतो व रस्ता होईपर्यंत हे आंदोलन चालूच राहील असा इशारा उपोषण करते समाजसेवक गजानन हरणे यांनी दिला आहे. परंतु ज्या विभागाशी हा प्रश्न निगडित आहे त्यांनी साधे चर्चेचे अवचित दाखवले नाही. बांधकाम विभागचे अधिकारी मात्र भ्रष्टाचार करण्यात व्यस्त आहेत त्यांना मात्र उपोषणा स्थळाला साधी भेट देण्याचे चर्चा करण्यासाठी वेळ मिळाला नाही. . पहिलेच या रस्त्यामध्ये लाखोचा भ्रष्टाचार करून रस्ता खराब करायचा व नंतर मात्र त्या रस्त्यावर काम करायचं नाही अशा पद्धतीचे दुटप्पी भूमिका महानगरपालिका व बांधकाम विभाग घेत असल्यामुळे जनतेत असंतोष निर्माण झाला असून प्रशासनाच्या या दुपटी धोरणा विरोधात जनतेमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. तरी उपोषणाची दखल प्रशासनाने या गंभीर बाबीची दाखल घ्यावी. आजच्या उपोषणाच्या समर्थनार्थ तसेच झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनास जागृत करण्याकरता आज उपोषण स्थळी अनेक राजकीय ,सामाजिक संघटनेच्या मान्यवरांनी भेट देऊन पाठिंबा दिला. त्यांच्या या उपोषणाला समर्थन म्हणून अनेक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी साखळी उपोषण करून या उपोषणास समर्थन दर्शविले. तसेच स्थानिक महिला मंडळ व गावकऱ्यांनी भजन आंदोलन करून सुस्त प्रशासनास जागृत करण्याचे काम उपोषण स्थळी केले. तरीही प्रशासन सुस्त झोपलेले आहे. या झोपलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना जागृत करण्या करीता आमरण उपोषण सहाव्या दिवशीही सुरुच आहे. तरी शासन प्रशासनाने या गंभीर बाबीची त्वरित दखल घेऊन हा रस्ता व या रस्त्यावरील कामे त्वरित पूर्ण करावे अन्यथा आंदोलक या पेक्षा शिवसेना स्टाईलने तीव्र केल्या जाईल याची सर्वांश्री जबाबदारी शासनाची राहील असा इशारा नगरसेवक मंगेशभाऊ काळे यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकाद्वारे दिला आहे. तरी शासन यावर काय निर्णय घेते याकडे मलकापूर तुकाराम चौक,येवता ,खडकी ,कानशिवनी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. आज सहाव्या दिवशी अनेक मान्यवरांनी भेटी देऊन समर्थ केले या रोडवर असलेल्या गावाच्या नागरिकांनी जाहीर पाठिंबा देऊन साखळी उपोषण केले. हजारो जागरूक नागरिकांनी उपोषण स्थळी भेट देऊन या उपोषणाला समर्थन व्यक्त करीत आहेत . आज उपोषण स्थळाला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या त्यामध्ये माजी आमदार गजानन दाळू गुरुजी, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक पटोकार, डॉ. पुरुषोत्तम तायडे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष रेणू अवी गावंडे, कार्यकारी अध्यक्ष नमन आंबेकर पाटील, जयश्री जायले, पंकज जायले जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याध्यक्ष मृदला अनंत गावंडे, इंदुमती देशमुख, माजी नगरसेवक विशाल गावंडे, पंकज साबळे, खडकी चे माजी सरपंच शंकरराव बिरकर मा. जि प सदस्य शंकरराव लंगोटे, जि प सभापती लखूआप्पा लंगोटे,वसंतराव देशमुख, रमेश तायडे कामगार नेते, गजानन बोराडे, अनिल परचुरे, ज्ञानेश्वर गावंडे, आदि मान्यवरांनी मंडपात उपस्थित राहुन पाठिंबा व्यक्त केला व धरणे दिले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....