कारंजा : स्थानिक जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळाकडून, गुरुवार दि.२ मार्च २०२३ रोजी,श्रीक्षेत्र खोलापूर येथील पूर्णा नदीतिरावरील,शिवपुराणात उल्लेख असलेल्या १५०० वर्षापूर्वीच्या पुरातन व जागृत श्री कोटेश्वर महादेवाची वारी,शिवभक्त डॉ. ज्ञानेश्रर गरड यांच्या सहकार्यातून करण्यात आली.यावेळी डॉ. ज्ञानेश्वर गरड यांचे हस्ते श्री. कोटेश्वर महादेवाचा अभिषेक व महाआरती करण्यात आली.सदहू वारी करीत असतांना मार्गात दिंडी प्रमुख संजय कडोळे आणि डॉ.ज्ञानेश्वर गरड यांचेकडून दुर्धर आजारग्रस्त मंडळीची मानवतेच्या दृष्टिकोनातून सद्भावना भेट घेऊन त्यांना खारीचा वाटा म्हणून आर्थिक मदतही देण्यात आली.
यावेळी वारीमध्ये श्रीमती शांताबाई गरड,श्रीमती दुर्गाबाई कडोळे,डॉ ज्ञानेश्वर गरड,संजय कडोळे,गोपाल मुदगल इ. होते. परत येतेवेळी त्यांनी संत पुंडलिक बाबा संस्थान मुर्तिजापूरची वारी करून दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी संत पुंडलिक बाबा संस्थानचे व्यवस्थापकिय विश्वस्त तथा पुंडलीक बांबाचे भाऊ पांतोड महाराज यांनी दिंडीप्रमुख संजय कडोळे तथा डॉ.ज्ञानेश्वर गरड व अन्य वारकरी मंडळींचे स्वागत केले.