कुठे नेऊन ठेवली मूल शहरातील वाहतुक व्यवस्था?हा संतापजनक सवाल मूल वासियांचा आहे. खास करून मूल शहरातून धावणारा दुपदरी
चंदपूर -गडचिरोली महामागं सध्यातरी ट्रॅव्हल्स वाल्यांचा मालकीहक्क ईलाका बनल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. बेकायदेशीर प़वासी वाहतुक करताना या खाजगी ट्रॅव्हल्स मालकांकडून शहरातून लावणाऱ्या महामागांला ट्रॅव्हल्सवाल्यांनी आपला बसस्थानक बनविल्याची नागरिकांची बोंब सुरू असूनही पोलिस वाहतुक विभाग व आर.टी.ओ.वाले या बेकायदेशीर व जिवघेण्या धंद्याला सरक्षण का देतात? हा सवाल शहरवासियांना यंत्रणेप़ती संताप व्यक्त करायला लावत असल्याचे चित्र आहे.
खाजगी ट्रॅव्हल्स वाल्यांनी आता तर चक्क बसस्थानकावरच अतिक़मण
केल्याचे विदारक चित्र असून यामुळे बसस्थानक परिसरात २०० मिटर परिसर आपातकालीन झाल्याची ओरड सुरू झाली आहे.
मूल शहरात माजी अर्थ मंत्री ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या कल्पकतेतून मॉडेल बसस्थानक बनविण्यात आला.शहरात अगदी महामागांवर बसलेल्या या बसस्थानकाच्या तोंडावर खाजगी ट्रॅव्हल्स ची जत्रा व त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी जिवघेणी ठरत असल्याची ओरड आहे.वाहतुक सुरक्षा भरारी पथकामध्ये महामंडळ,पोलिस, आर.टी.ओ. सहभागी असतात मात्र मूल शहरातील सदर दुदैवी चित्र यांना का दिसत नाही? की या यंत्रणेचे हे अर्थ पूर्ण दुर्लक्ष आहे यावरून जनता संभ़मात असल्याचे चित्र दिसत आहे.