कारंजा येथून जवळच असलेल्या मौजे दुगोरा येथील अल्पभूधारक शेतकरी वासुदेव नारायण भगत यांनी सततची नापीकी, शेतकरी विरोधी सरकारी धोरण, अंगावर असलेले बँकांचे कर्ज आणि गरिबीला कंटाळून आपले राहते घरी दिनांक 21 ऑक्टोंबर 2025 रोजी मध्यरात्री बाराच्या सुमारास आत्महत्या केली.त्यांनी स्वतःला आपल्या घरामध्ये दोरीने गळफास लावून स्वतःचे जीवन संपविले. त्यांच्या मागे तीन मुले असून त्यातील मधल्या मुलाने सुद्धा फाशी घेऊन चार ते पाच वर्षांपूर्वी शासनाच्या शेतकरी धोरणामुळे आत्महत्या केली होती. त्यांच्या मागे दोन मुले, तीन सुना, नातू ,नात असा बराच मोठा आप्तपरिवार त्यांच्या परिवारात त्यांच्या भरोशावर होता .जर शासनाने ओला दुष्काळ कर्जमाफी जर केली असती तर सदर कास्तकारावर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती.अशी जनतेमध्ये चर्चा सुरू आहे.सदर वृत्त ग्रामीण पत्रकार ब्रह्मानंद बाडे पाटील यांचे कडून मिळाले असून पुढील चौकशी उंबर्डा बाजार पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी करीत आहे.