अमरावती विभागीय शिक्षक संघाकडून लाडके शिक्षक आमदार अँड.किरणराव सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा संपन्न ! साप्ताहिक करंजमहात्म्य आणि दैनिक विश्वजगत च्या वाढदिवस विशेषांकाचे थाटात प्रकाशन.
वाशिम:-
अमरावती विभागीय शिक्षक संघाकडून,अमरावती विधानपरिषद मतदार संघाचे सदस्य असलेले सर्वांचे लाडके व लोकप्रिय असलेले शिक्षकांचे शासनातील अभ्यासू व अनुभवी लोकनियुक्त प्रतिनिधी आणि हाडाचे सामाजिक कार्यकर्ते,ज्येष्ठ विधीज्ञ असणारे,शिक्षक आमदार,भाऊसाहेब अँड.किरणराव सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.त्यानिमित्ताने सर्वप्रथम,श्री.शिवाजी शिक्षण संस्थेच्या परिसरात,पर्यावरण रक्षणाकरीता भाऊसाहेबांचे शुभहस्ते वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.त्यानंतर सामाजिक आरोग्याच्या दायित्वाच्या दृष्टिने श्री शिवाजी महाविद्यालय येथे भव्य असे रक्तदान शिबीर सुद्धा पार पडले. यावेळी भाऊसाहेबांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. शेतकऱ्यांचा पोळा सण असतांनाही भाऊसाहेबांना भेटण्या करीता आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरीता,परिसरातील त्यांच्या यवतमाळ,अमरावती,अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील चाहत्या शिक्षकांची आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. विशेष म्हणजे त्यांना भेटणार्यामधे सत्ताधारी पक्ष कार्यकर्त्यांसह अनेकांचा समावेश होता.यावेळी त्यांचे रिसोड,वाशिम,कारंजा (लाड) येथील जुने जाणते मित्रमंडळी देखील उपस्थित होती.व महत्वाचे म्हणजे श्री.शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य अरुणरावजी सरनाईक,डॉ. स्नेहादिप भैय्या सरनाईक, संस्थेचे पदाधिकारी आणि प्राध्यापक व शिक्षक मंडळी आलेल्या पाहुण्यांचे स्वतः जातीने स्वागत व चौकशी करीत होते. याप्रसंगी भाऊसाहेब यांचे शुभहस्ते,कारंजा (लाड) येथील त्यांचे मित्र विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष तथा साप्ताहिक करंजमहात्म्य या लोकप्रिय वृत्तपत्राचे मुख्य संपादक (महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त साहित्यीक)संजय कडोळे यांनी, वाढदिवसानिमित्त प्रकाशित केलेल्या,साप्ताहिक करंजमहात्म्य आणि बुलडाणा येथील गजानन काटे यांच्या दैनिक विश्वजगत विशेषांकाचे सुद्धा थाटात प्रकाशन करण्यात आले.

याप्रसंगी संजय कडोळे यांनी आपल्या मनोगतामधून भाऊसाहेबांना भरभरून शुभेच्छा दिल्या.व एकदा अशा अभ्यासू नेतृत्वाची मंत्रीमंडळात वर्णी लागावी अशी भावना व्यक्त केली. आपल्या सत्काराला उत्तर देतांना, भाऊसाहेबांनी आपल्यावर नितांत प्रेम करणाऱ्या विभागातील वाशिम,अकोला, यवतमाळ,अमरावती,बुलडाणा येथून आलेल्या शिक्षकांचे, चाहत्यांचे आभार मानले.तसेच ते पुढे बोलतांना म्हणाले की, शिक्षकांच्या सर्वांगीन विकासाकरीता मी प्रत्येक वेळी शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून, मराठी शाळा व शिक्षकांच्या समस्या मांडीत आहे. नविन शाळांच्या अनुदानाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याची आशा आहे. शिक्षकांच्या १०-२०-३० वार्षिक वाढ आश्वासित प्रगती योजनेचा मार्ग निघाला आहे.तसेच शिक्षणमंत्री यांच्या माध्यमातून 61 हजार शिक्षकांच्या मानधनात सुद्धा शिक्षणमंत्री ना.केसरकर यांनी वाढ केलेली आहे.आपला जिल्हा बंजारा समाजाचे विश्वगुरुपिठ असलेल्या,श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराजाची पवित्र नगरी असलेला जिल्हा आहे.

त्यामुळे वाशिम येथील जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाला,संत सेवालाल महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी मी शासनाकडे लक्ष्यवेधी मागणी केलेली असून, मला विश्वास आहे.लवकरच ही मागणी पूर्ण होणार आहे.मी माझे संपूर्ण आयुष्य मराठी शाळांच्या भवितव्या करीता आणि शिक्षकांच्या न्यायहक्का करीता तसेच जिल्ह्याच्या विकासाकरीता समर्पित केलेले आहे. असेही त्यांनी सांगितले.यावेळी विविध राजकिय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक संघटना,शैक्षणिक संघटना,शिक्षक संघटना पदाधिकारी कार्यकर्त्यांसह त्यांचे कारंजा (लाड) येथील मित्रमंडळी उपस्थित होती.त्यामध्ये संजय कडोळे,प्रदिप वानखडे,हभप.लोमेश पटिल चौधरी,संजय नेमाने,गोविंदराव मुंदेकर,नितीन उर्फ पप्पूसेठ भट, सुभाष पाटील गाडगे,दिनेश अढाऊ इत्यादीनी त्यांचे पुष्पगुच्छा देवून अभिनंदन केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....