आरमोरी :-
स्थानिक विद्यालय आरमोरी येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्याने "आम्ही सावित्रीच्या लेकी"या उपक्रमात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला विद्यालयातील मुलींनी कार्यक्रमांची सर्व जबाबदारी उचलून संचालन, पाहुणे, आभार हे सर्व मुलींनी सर्व जबाबदारी स्वीकारली.कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कु. अमृता बन्सोड, मार्गदर्शक कु. अंकिता बन्सोड, कु. पूर्वा कवसें प्रमुख पाहुणे कु.तनु ठाकरे, कु. प्रियांका राऊत, कु. शारदा राऊत, कु. सलोनी मेश्राम, सावित्रीबाई फुले यांच्या वेषात कु. कशिश नागदेवते, कु. अनुष्का पाटील या उपस्थित होत्या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. तृप्ती खोबरे, प्रास्ताविक श्रुती वनस्कर, आभार कु. वेदिका बोरकर यांनी केले.
वरीला कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य श्री फुलझेले, प्रा. कु. शेंडे, प्रा. मेश्राम, प्रा. प्रधान, प्रा. सहारे, प्रा. नैताम, प्रा. दोनाडकर, प्रा. सेलोकर, प्रा. म्हशाखेत्री, प्रा.राखाडे, प्रा. कु. सरवे यांनी सहकार्य केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....