कारंजा : राजकिय पदावर असो किंवा नसो. परंतु कारंजा शहरातील सर्वधर्मियामध्ये लोकप्रिय असलेले,कारंजेकराचे आशास्थान म्हणून मृत्युपूर्वी जवळ जवळ तिस वर्षे पर्यंत, माजी आमदार, विकासमहर्षी स्व प्रकाशदादा डहाके यांनी, कारंजातील नागरिकांच्या ह्रदयावर अधिराज्य केले होते. आणि म्हणूनच दादा जेव्हा आपल्या मधून निघून गेले तेव्हा दादांच्या चाहत्यांसोबतच दादांच्या विरोधकांनाही दुःख झाले होते. आज जेव्हा जेव्हा कारंजा शहरात सण उत्सव साजरे होतात तेव्हा तेव्हा दादांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवते. आणि दादांचे महत्व काय होते ? ते कळून येते. कोणतेही सार्वजनिक सण-उत्सव-त्यौहार म्हटले म्हणजे, लोकप्रतिनिधी आमदार, नगराध्यक्ष,माजी आमदार ,माजी नगराध्यक्ष आणि प्रतिष्ठित व्यक्तिंनी शांतता, सलोखा, सर्वधर्म समभाव तथा राष्ट्रीय एकात्मता,सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरीता १००% उपस्थित राहून लोकभावना जपण्याची गरज असल्याचे मत कारंजेकर नागरिकांकडून व्यक्त होत आहे.