वरोरा:--
वरोरा शहरातील बालाजी मेडिकल स्टोअर्सच्या मालकाच्या हलगर्जीपणामुळे ज्योती जगन वांढरे (रा. वनोजा) यांना दिलेल्या औषधी मुळे गंभीर त्रास झाला त्यांना चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत.
१२ फेब्रुवारी रोजी, वरोरा येथील जुन्या पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या बालाजी मेडिकल मधून
गळा दुखणे आणि खोकल्याचा त्रास असल्याने औषध घेतले. त्यांनी ‘अवॉइड ड्रग्स’ कार्ड दाखवून योग्य औषध देण्याची विनंती केली होती. मात्र, औषध घेतल्यानंतर त्यांना तीव्र एलर्जीचा त्रास, उलट्या आणि चक्कर येऊ लागली. महिलेने
प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना चंद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
या घटनेबाबत वरोरा पोलीस ठाण्यात तसेच अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे, मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
गंभीर बाबी:
1) रुग्णाने "अवॉइड ड्रग्स" कार्ड दाखवूनही चुकीचे औषध देण्यात आले, ज्यामुळे तिची प्रकृती गंभीर झाली.
2) या हलगर्जीपणामुळे रुग्णाला जीवघेणा त्रास सहन करावा लागला.
3) तक्रार दाखल होऊनही संबंधित प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
तातडीच्या मागण्या:
संबंधित मेडिकल स्टोअर्सच्या हलगर्जीपणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्न व औषध प्रशासनाने तातडीने चौकशी करून संबंधित मेडिकल चालकाचा परवाना रद्द करावा. रुग्णाच्या उपचाराचा संपूर्ण खर्च दोषी मेडिकल चालकाकडून वसूल करून पीडित कुटुंबाला मदत करण्यात यावी. अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी सर्व मेडिकल स्टोअर्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात.
मागण्यांचा सकारात्मक विचार करून तातडीने योग्य कार्यवाही त्या मेडिकल वर करण्याची मागणी युवासेनेचे आलेख रमेश रट्टे यांनी प्रकाश आबिटकर,
मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केली आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....