धुळे : धुळे शहरातून मोटारसायकल चोरी झाल्याची घटना घडली होती. मोटरसायकल चोरी करणाऱ्या मालेगाव येथील चोरट्याला धुळे शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने चोरी केलेल्या मोटरसायकलसह आणखी दोन मोटरसायकली पोलिसांनी या चोरट्याकडून हस्तगत केल्या आहेत.
तीन वर्षे कारावासाची दाखविली भीती; महिलेची साडेआठ लाखात फसवणूक
धुळे (Dhule) शहरातील जेलरोड परिसरामध्ये तक्रारदाराने मोटरसायकल लावलेली असताना चोरट्याने तेथून मोटरसायकल लंपास केली होती. या संदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात (Dhule Police) संबंधित तक्रारदाराने तक्रार दिली होती. यावरून धुळे शहर पोलिसांनी या संदर्भात तपास सुरू केला. यादरम्यान गुप्त माहितीच्या आधारे धुळे शहर पोलिसांनी सुरत बायपास हायवेवरील हॉटेलजवळ संबंधित चोरटा चोरी केलेल्या मोटरसायकलसह उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ संबंधित ठिकाणी पोहोचून मोटरसायकल चोरट्याला चोरलेल्या मोटरसायकलसह ताब्यात घेतले. याची पोलिसांनी आणखी चौकशी केली असता त्याने आणखी दोन मोटरसायकल चोरी केल्या असल्याची कबुली दिली. त्या मोटरसायकली देखील पोलिसांनी हस्तगत केल्या असून धुळे शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.