ब्रम्हपुरी:- आजादी का अमृत महोत्सव निमित्त महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अर्तगत शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
दिनांक २० एप्रिल २०२२ ला सकाळी ९ वाजता पासून ते दुपारी २ वाजता पर्यंत ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी सदर शिबीराची सुरवात होणार आहे.
सदर शिबीरात स्त्री रोग तज्ञ,दंत चिकित्सक, भिषक तज्ञ, नेत्र तज्ञ,सर्जन,बालरोग तज्ञ,कान, नाक,घसा तज्ञ ,आदी विशेषतत्ज्ञ मंडळी उपस्थित राहणार असून सदर रुग्णांना रुग्ण सेवा देणार असून तसेच आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अर्तगत रुग्णांची नोंदणी व हेल्थ आय डी कार्ड तयार करून देण्यात येईल. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अर्तगत गोल्डन आय डी कार्ड तयार करण्यात येईल तरी जास्तीत जास्त संख्येने रुग्णांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रितम खंडाळे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास दुधपचारे यांनी केले आहे.