दिनांक 8 ऑगस्ट 2025 ला रक्षाबंधन च्या निमित्ताने लोकार्पण महाविद्यालयात Rakhi Making Competition स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार व बक्षीस वितरण दिनांक :- १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून करण्यात आले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण हे लोकार्पण बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्था येथील संचालक मा. संजीव बन्सोड सर, लोक विद्यालय गांगलवाडी येथील मुख्याध्यापक मा. एस.आर. बुरडे सर, लोकार्पण महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. शेंडे मॅडम, ज्युनिअर कॉलेज च्या प्रा. सौ. अक्षयी राऊत मॅडम, प्रा. प्रणय गुरनुले सर, यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच या कार्यक्रमास लोक विद्यालय आणि लोकार्पण महाविद्यालयाचे संपूर्ण शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी प्रथम क्रमांक कुमारी. सुप्रिया सुधीर तिजारे हिने प्राप्त केले तर द्वितीय क्रमांक कुमारी प्रियल विश्वनाथ मांढरे या विद्यार्थिनीने पटकाविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रामटेके सर तर आभार प्रा.प्रतिमा चौधरी मॅडम यांनी केले