पतंजली योगपीठ हरिद्वारच्या वार्षिक कार्यक्रमावलीनुसार पतंजली परीवार ब्रम्हपुरी तर्फे ४ आँगष्ट ला नुकताच आयुर्वेद शिरोमणि आचार्य बालकृष्ण यांचा जन्मदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला., स्वदेशी चिकीत्सा आणि वैदिक संस्कृतीच्या माध्यमातून सेवा, साधना आणि विविध औषधिय वनस्पतींचे संशोधन करीत पतंजली योगपीठ रूग्णांना विविध असाध्य आजारातून मुक्त करीत आहे. या सर्व प्रक्रियेत आचार्य बालकृष्ण यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या जन्मदिना निमित्य स्टेट बँक काॅलनी आणि विवेकानंद योग केंद्र देलनवाडी ब्रम्हपुरी येथे पतंजली योग समिती,भारत स्वाभिमान न्यास ,पतंजली किसान सेवा समिती ,युवा भारत तसेच पतंजली महिला समिती यांचे तर्फे जडीबुटीदिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी औषधिय होमहवन ,जडीबुटी वितरण तसेच बेल, कवट, आवळा , पिंपळ इत्यादी देशी रोपांचे वृक्षारोपण उपस्थितांकडून करण्यात आले. जिल्हा प्रभारी भगवान पालकर यांनी जडीबुटी दिनाचे प्रास्ताविक संबोधन तथा पतंजली योगपीठाच्या कार्याचे विवेचन केले. याप्रसंगी पतंजली योग समिती ब्रम्हपुरी तालुका प्रभारी नरेश ठक्कर , ब्रम्हपुरी तालुका किसान सेवा समिती प्रभारी यशवंत तलमले , कार्याध्यक्ष दिनकरराव हजारे,तहसिल युवा सहप्रभारी लोकेश मुळे योगसाधक मधुकर खेत्रे,रामकृष्ण थोटे, डाॅ. रामेश्वर राखडे, ज्ञानेश्वर राखडे सर, प्रमोदजी गजपुरे, तुळशिरामजी सपाटे, मारोती कार, हरीओम मेश्राम,कमलाकर फाये,दिलिप राजुरकर, माणिकजी खुणे, देविदास चिंचेकर,सौ.सुधा पालकर, विनोद चन्नोळे उपस्थित होते.