कारंजा : (प्रतिनिधी संजय कडोळे) पंचक्रोशीतील गोसावी नाथ संप्रदायाचेच नव्हे तर सकल हिंदुत्व समाजाचे आद्य श्रध्दास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या,मुर्तिजापूर तालुक्यातील, ग्राम कुरूम येथील जागृत दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सद्गुरू संत केशवभारती महाराज संस्थान कुरुम ता मुर्तिजापूर जि. अकोला येथील संत केशवभारती महाराज संस्थान आणि गावकरी व पंचक्रोशीतील भाविक सदगुरू भक्तमंडळीच्या अथक सहकार्यातून गुरुवार दि. 24 ऑगष्ट ते 31 ऑगष्ट 2023 पर्यंत दररोज सकाळी 09:00 ते दुपारी 12 : 00 आणि दुपारी 03:00 ते 06:00 वाजेपर्यंत दोन सत्रामध्ये, श्रीक्षेत्र वृंदावन निवासी, श्रीमद्भागवत कथा वाचक श्रध्देय पंकज कृष्णाजी महाराज यांच्या अमृतवाणीमधून,संगीतमय श्रीमद्भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रद्धेय पंकज महाराज यांना विजय राऊत (तबला वादक), गौरव पांडे (ऑक्टोपॅड वादक), प्रतिक खांडगळे (ऑर्गन वादक), सोनू ढोलवाडे (झांकी संयोजक) यांचे संगीत सहकार्य राहील. याशिवाय सप्ताहात दररोज प्रातःकाळी 05:30 ते 06:30 पर्यंत काकड आरती ,सायंकाळी 07:00 ते 08:00 पर्यंत हरिपाठ, दररोज रात्री 09:00 हरिकिर्तन आणि दररोज सकाळी 07:00 ते 09:00 या हभप अवधुत महाराज इंगळे कुरूम यांचे सुमधूर वाणी मधून, सद्गुरू संत केशवभारती महाराज चरित्र लिलामृत ग्रंथ आणि गजानन विजय ग्रंथाचे पारायण होईल. शिवाय बुधवार दि 30 ऑगष्ट रोजी दुपारी 04:00 समस्त हरि भक्त परायण संतमंडळीसह मुर्तिजापूर बार्शिटाकळी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार हरिष पिंपळे यांचा संस्थानतर्फे भव्य सत्कार करण्यात येईल. तसेच गुरुवार दि 31 ऑगष्ट रोजी सकाळी 08:00 वाजता कुरूम नगरीतून पालखी परिक्रमा शोभायात्रा, गोपालकाल्याचे किर्तन दहीहंडी व त्यानंतर दुपारी भव्य महाप्रसाद कार्यक्रम होईल. तरी पंचक्रोशीतील भाविकांनी, श्रीमदभागवतकथा कार्यक्रम महाप्रसादाकरीता आर्थिक सहकार्य करावे आणि कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानकडून करण्यात आले आहे.