शहरातील अरविंद ज्वेलर्स, ठवकर कॉम्प्लेक्स येथे चोरी झाल्याची घटना दिनांक 05/12/2024 रोजी रात्री 01:00 वा ते 05:00 वा. चे दरम्यान घडली.!
अज्ञात आरोपीनि अरविंद ज्वेलर्सचे पाठीमागील भिंतीस छिद्र पाडून आत ज्वेलर्स मध्ये प्रवेश करून खाली नमूद वर्णनाची मालमत्ता चोरी करून पसार झाला.
चोरीस गेलेली मालमत्तामध्ये चांदीचे पायल 15 जोड 700 ग्रॅम (प्रति 10 ग्राम 950/-रुपये) अंदाजे 66,500/-,गणपती मूर्ती, लक्ष्मी मूर्ती व चांदीची करंडे अशी 1 किलो चांदी अंदाजे किंमत 95000/, रोख रक्कम:-2000/-
अशी एकूण किंमत- 1,63,500 चोरी गेलेली आहे. असे अरविंद ज्वेलर्स चे मालक अरविंद भाऊराव डोंगरे, वय 48 वर्ष, रा. विठ्ठल मंदिर जवळ, आरमोरी यांनी तपासाअंती सांगीतले.