घुग्घुस (चंद्रपूर) : वेकोलीच्या घुग्घुस - 2 खाण परिसरातील नकोडा राममंदिर जवळ सकाळी 9 वाजता दरम्यान अवैध माती (ओव्हर बर्डन) उत्खनन करीत असलेल्या 1 जेसीबी, 2 हायवा, 4 ट्रॅक्टर समेत चार लोकांनां वेकोली सुरक्षाकर्मी वैभव निमकर, अजय राय व महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांनी पकडून घुग्घुस पोलिसांच्या स्वाधीन केले.
गेल्या आठवड्याभरा पूर्वी 28 सप्टेंबर रोजी याच परिसरात रात्रीच्या वेळेस अवैध माती उत्खनन करतांना घटनास्थळीच पकडण्यात आले होते व पोलिसांच्या स्वाधीन केले होते. मात्र, त्यावेळी माती तस्करांनी जेसीबी मशीन लंपास केल्याने पोलिसांनी कुठल्याही प्रकारे ठोस कारवाई केली नाही.
त्यामुळेच तस्करांचे दिवसांदिवस धाडस वाढत आहे. महसूल विभागा तर्फे कुठलीच कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.आता पोलीस चौकशीत या वाहनांचे चालक - मालक कोण आहेत हे समोर येथीलच आता या वाहनावर दंड बसविण्यात येतो की सोडली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.