अकोला महानगरपालिका आयुक्तांनी येत्या चार दिवसात मोरणा नदीवरील जलकुंभी न काढल्यास त्यांच्या निवासस्थानी नदीकाठीचे नागरिक झोपण्यासाठी अभिनव पद्धतीने आंदोलन करतील असा इशारा भाजपा प्रसिद्धीप्रमुख माजी नगरसेवक गिरीश जोशी यांनी दिला.
अकोला महानगरपालिकेने जलकुंभी काढण्याचे कार्य सुरू आहे अशा प्रकारचा प्रचार केला परंतु प्रत्यक्षात जलकुंभी काढण्यात आली नाही त्यामुळे नदीकाठीतील शहरातील 10 प्रभाग मच्छरांच्या डासांच्या त्रासापासून त्रस्त असून रात्री त्यांना झोपण्यामध्ये अनेक अडचणी येत असून रोगराई परसत आहे या संदर्भात मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी कारवाई न केल्यास त्यांच्या निवासस्थानी जलकुंभी त्रस्त नागरिक झोपण्यासाठी जन आंदोलन करतील येत्या चार दिवसात यासंदर्भात कारवाई न केल्यास आंदोलन उभारण्यास राहील त्यांना वारंवार भाजपा लोकप्रतिनिधी सूचना दिल्यावर सुद्धा केवळ वृत्तपत्रात प्रचार प्रसार करून जलकुंभी काढण्याचा खोटा नाटक करण्यात येत आहे या संदर्भात नदीकाठी नागरिक त्रस्त असून ताबडतोब कारवाई करण्यात यावी अन्यथा जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा भाजपा प्रसिद्धीप्रमुख माजी नगरसेवक गिरीश जोशी यांनी दिला आहे.