कारंजा लाड(जिल्हा प्रातिनिधी संजय कडोळे): अटलबिहारी वाजपेयी हे देशाचे पंतप्रधान असतांना राज्यघटनेची समिक्षा करण्याचा प्रयत्न केला गेला होता, तेंव्हा सोनियाजी गांधी यांनी संसदेत कडाडून विरोध करीत राज्य घटना बदलण्याचा प्रयन कराल तर संसद चालू देणार नसल्याची गर्जना केली तेव्हा पासून आज पर्यंत राज्यघटना अबाधित आहे. परंतु आता पुन्हा राज्यघटना बदलण्याचा कट केंद्र सरकार करीत आहे.असे प्रतिपादन करून देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी काँग्रेसला साथ द्या.असे भावनिक आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव दिलीप भोजराज यांनी केले.
कारंजा शहर काँग्रेस कमेटीच्या वतीने प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष आमदार अमित झनक सूचनेनुसार प्रभाग निहाय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन राहुल नगर येथे करण्यात आले होते त्यावेळी दिलीप भोजराज अध्यक्ष पदावरुन बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अमरावती विभागीय पदवीधर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार धिरज लिंघाडे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अँड. दिलीपराव सरनाईक,काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग शहर अध्यक्ष युसूफ जट्टावाले, सेवादल काँग्रेस शहर अध्यक्ष ॲड.वैभव लाहोटी, कमलेशजी सपकाळ,नितीनजी जाधव,शिवाजीराव देशमुख,राज चौधरी,अक्षय बनसोड,प्रफुल गवई,अभिजित शिंदे,फैजल खांन,कुंदन तायडे,योगेंद्र जामनिक, विठ्ठलराव कवळे, अयुब भाई, शोराब खांन पठाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी सर्वप्रथम प्रमुख अतिथींनी तथागत भगवान गोतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले
यावेळी आमदार धीरजजी लिंघाडे यांनी कारंजा शहर व ग्रामीण भागात काँग्रेस मजबूत कसी होईल याकडे आपण आवर्जुन लक्ष घालू अशी ग्वाही दिली.अँड दिलीपराव सरनाईक,राज चौधरी यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले
यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी कांग्रेस पक्षात प्रवेश घेतला
कार्यक्रमाचे सूत्र संचालन वाशिम जिल्हा काँग्रेस सेवादलाचे जिल्हा समन्वयक ॲड.संदेश जैन जिंतुरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शहर काँग्रेस अध्यक्ष अमिर खान पठाण यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....