वाशिम : केंद्र शासनाने आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हमी भावाने ज्वारी, बाजरी,मका या भरडधान्य पिकांची वाशिम , मालेगाव, मानोरा, कारंजा, रिसोड, व मंगरुळपीर तालुक्यातील खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणीकरीता 31 मे पर्यत मुदत देण्यात आली आहे. हायब्रीड ज्वारीचा 3 हजार 180 रूपये, मका 2 हजार 90 रूपये प्रतिक्विंटल हमीभाव असून 30 जुन पर्यत खरेदीची मुदत आहे.
शासनाने भरडधान्याचे हमीभावानुसार शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी NeML पोर्टलवर करण्याकरीता शेतकऱ्यांचा सातबारा, पिकांची नोंद असलेला सातबारा, आधारलिंक असलेला बँकेचा खातेक्रमांक,आधारकार्डची छायाप्रत, मोबाईल क्रमांक व ऑनलाईन नोंदणी करतेवेळी शेतकऱ्यांचा फोटो घेणे बंधनकारक आहे. पेमेंट प्रणाली PFMS असुन आधारलिंक असलेले बँक खाते क्रमांक घेण्यात यावे.तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा मार्केटींग अधिकारी पी.एस.शिंगणे यांनी केले आहे.