वरोरा तालुक्यातील खांबाडा येथील पिडीत महिलेने आज दी. ७ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३:४५ वाजताच्या सुमारास पोलिस स्टेशन परीसरात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
वरोरा पोलीस स्टेशन मध्ये पीडित महीलेने ३१ऑक्टोबर २०२२ रोजी आरोपी इरफान शेख , रिजवान शेख वय ३२,मोहसीन शेख २४,दानिश शेख २७, मोहसीन शेख ६२ वर्ष यांच्या पासून पीडितास धोका असल्याने त्यांना त्वरित अटक करण्यात यावी याबाबत तक्रार दिली होती. यातील शेख इमरान याने माझ्यावर अत्याचार केला असून या सर्वांना त्वरित अटक करावी म्हणून तक्रार दिली होती. माञ संपूर्ण आरोपीवर त्वरित कारवाई करण्यासाठी पीडित महिला वारंवार पोलीस विभागाला निवेदन देत कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता . त्या अनुषंगाने पोलीस तपास अधिकारी यांनी आरोपी इमरान शेख यांचेवर ३७६ , अट्रॉसिटी अक्ट नुसार गुन्हा दाखल केला. सहआरोपी यांनी पीडित महिलेला मारहाण केल्या प्रकरणी कलम ३२४ व अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला.
मात्र पीडित माहिलेने संपूर्ण आरोपींचे सुटका होऊ नये असे झाल्यास तपास अधिकारी यावर कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालया समोर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार दिनांक ७ ऑगस्ट रोजी पीडित महिला खांबाडा येथून सकाळी १०:०० वाजताच्या सुमारास चंद्रपूर येथे जायला निघाली याची माहिती पोलीस विभागाला कळताच पोलिसांनी रत्नमाला चौकात बस थांबवून महिलेला संमजविण्याचा प्रयत्न केला.माञ महिला ही बस मधून उतरण्यास तयार नसल्या कारणाने सकाळी ११:०० वाजता ही बस पोलीस स्टेशन परिसरात आणण्यात आली. महिलेला पोलिसांनी बस मधून उतरवीत पोलीस स्टेशन येथे आणून तिला पुन्हा एकदा मनाधरणीचे काम केले. या दरम्यान दुपारी ३:४५ वाजाताच्या सुमारास महिलेने आपल्या जवळील असलेल्या पाण्याची बॉटल काढून पाणी पिणे असता काही विषारी द्रव्य त्यात असल्याने पीडित महिलेची प्रकृती बिगडू लागली पोलिसांनी महिलेला त्वरित उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले.
आज दिनांक:- ७ ऑगस्ट २०२३ (पोलिस स्टेशन येथे या प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांनी पत्रकार परिषदेत आरोपी यांच्यावर बलात्कार चा गुन्हा तसेच अन्य आरोपी यांच्यावर मारहाणी चा गुन्ह्याची नोंद करून अटक करण्यात आली असून हे प्रकरण न्यायालयीन असून आज झालेल्या घटनेवर पीडित महिलेवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे सांगितले.